पोलीस निरीक्षक पाचपुते, अपंग संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन
गुहागर : गुहागर तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी नेमला जाईल. गुहागर पोलीस स्थानकाकडून या संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य मिळेल. असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक श्री. तुषार पाचपुते यांनी केले. ते गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. Guhagar Taluka Disability Rehabilitation Institute
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था वरवेली, ता. गुहागर मध्ये नुकताच जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेमा केअर लोटे कंपनीचे डायरेक्टर श्री. परमार, पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल जोशी, वरवेली सरपंच सौ. पूनम रावणंग, एक्युप्रेशर व मसाज पेशालीस्ट डॉ. बहुतुले, उपस्थित होते.Guhagar Taluka Disability Rehabilitation Institute
लेमा केअर कं. लोटेचे चेअरमन परमार आणि मनसेचे तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी अपंग संस्थेला सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले. जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 20 वा वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गरजू दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी शीतपेटीचे वाटप करण्यात आले. गरजू दिव्यांगांना वेगवेगळया कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. Guhagar Taluka Disability Rehabilitation Institute

संस्थेला अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे अरुण मुळे यांचा संस्थेच्यावतीने शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू व सर्व मंत्रीमंडळ यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला समाजसेवक अरुण मुळे, मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर, संस्थेचे सल्लागार विनायक ओक, गणेश किर्वे, संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सरचिटणीस सुनील रांजाणे, खजिनदार सुनील मुकनाक, संचालक अनिल जोशी, प्रवीण मोहिते, सौ. सानिका रांजाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार सुधाकर कांबळे यांनी केले. तर आभार सौ. मंगल अनुगुडे यांनी मानले. Guhagar Taluka Disability Rehabilitation Institute

