Guhagar News, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नविन मतदार नोंदणी घेण्यात आले. यावेळी 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. Voter Registration Camp
निवडणूक आयोगातर्फे 9 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पाटपन्हाळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र व इतिहास विभागाने नवीन मतदार नोंदणी शिबीर (Voter Registration Camp) आयोजित केले होते. शिबिराला पाटपन्हाळे साठी नियुक्त करण्यात आलेल्या बी.एल.ओ. सौ. अश्विनी आव्हाड, पाटपन्हाळे तलाठी सचिन शिंदे व प्रशांत कानिटकर उपस्थित होते. मतदाराची कर्तव्य, मतदार होण्याचे महत्त्व या विषयावर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ. आव्हाड आणि सचिन शिंदे यांनी नवीन मतदार नोंदणी कशी होते याची माहिती दिली. त्यानंतर 70 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीचे अर्ज भरुन कागदपत्रांसहीत बी.एल.ओ. सौ. आव्हाड यांच्याकडे सुपूर्त केले. Voter Registration Camp
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रमोद देसाई, इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रसाद भागवत उपस्थित होते.

