मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे आयोजन
Guhagar News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. Samruddhi achieve 2nd Prize
निबंध स्पर्धेसाठी कु. समृद्धी आंबेकर हीने “पुस्तक आपला खरा मित्र ” या विषयावर निबंध सादर केला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिला विद्यासमिती प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षीस जाहीर झाले होते. हे प्रमाणपत्र व बक्षिस मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या हस्ते कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिला प्रदान करण्यात आले. Samruddhi achieve 2nd Prize
समृद्धीने मिळवलेल्या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिताताई वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. Samruddhi achieve 2nd Prize

