• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

त्याला जनतेने दुसर्यांदा निवडले

by Mayuresh Patnakar
December 6, 2022
in Guhagar
238 2
1
Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

Gram Panchayat ELections in Guhagar: Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

467
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

साखरी त्रिशुळ ग्रामपंचायत बिनविरोध; सचिन म्हसकर सरपंच

गुहागर, ता. 6 : तालुक्यातील साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने एक विक्रम केला आहे. थेट जनतेतून सरपंच निवड बिनविरोध करताना येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सचिन म्हसकरची निवड केली. Second Time He is elected as Sarpanch सोमवारी (ता. 5) छाननीमध्ये साखरी त्रिशुळ गावातील सर्व उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरल्याने या निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे.  त्यामुळे सलग दोन वेळा थेट जनतेतील सरपंच बनविण्याचा विक्रम तालुक्यात प्रथमच सचिन म्हसकर यांनी केला आहे.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सचिन म्हसकर सरपंच पदाचे उमेदवार होते. 2017 मध्ये प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडून द्यायचा होता. या निवडणुकीत सचिन म्हसकर हे बहुमताने विजयी झाले. सर्वात तरुण सरपंच म्हणून सचिन म्हसकर यांनी साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायत कारभाराची कोणताही अनुभव नसताना ज्येष्ठ, अनुभवी ग्रामस्थ, ग्रामसेवक, पंचायत समितीमधील अधिकारी, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे मित्र असलेले पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून गावाच्या विकास कामांना सुरवात केली.

Second Time He is elected as Sarpanch : ग्रामस्थांनी बीनविरोध निवडून दिलेल्या उमेदवारांच्या उपस्थित नामनिर्देशन पत्र सादर करताना सचिन म्हसकर

Second Time He is elected as Sarpanch

त्यांच्या पाच वर्षातील कारभाराने ग्रामस्थ समाधानी होते. त्यामुळेच 2022 मध्ये होणाऱ्या साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सचिन म्हसकर यांना गावाने पुन्हा सरपंच पदाची संधी दिली. सरपंच पदाची ही निवडणूक देखील थेट जनतेतून असल्याने सचिन म्हसकर यांच्या नावाला संपूर्ण गावाची सहमती आवश्यक होती. Second Time He is elected as Sarpanch

यावेळी साखरी त्रिशुळ गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. माजी पोलीस पाटील आणि नवनियुक्त तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. महमद अली हारून तुरुक यांनी पुढाकार घेतला. त्याला सर्व वाड्यांच्या प्रमुखांच्या सहकार्य मिळाले. वाडी, प्रभाग, गाव अशा वेगवेगळ्या स्तरावर बैठका झाल्या. Second Time He is elected as Sarpanch

संवादातून सहमतीने सरपंच म्हणून सचिन रामचंद्र म्हसकर;  प्रभाग क्र. 1 मधून सुवर्णा शंकर भोसले, सिताराम गणू म्हसकर आणि दर्शना दत्ताराम बेटकर; प्रभाग क्र. 2 मधून शकील दाऊद तुरुक आणि मसुदा शकील तुरुक; प्रभाग क्र. 3 मधून राकेश तुकाराम चाफे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून नावे निश्चित झाली. प्रभाग दोन मधील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री साठी आरक्षित आहे. त्या जागेसाठी जात पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली महिला न मिळाल्याने ही जागा आज रिक्त आहे. Second Time He is elected as Sarpanch

सोमवारी (ता. 5) छाननीमध्ये साखरी त्रिशुळ गावातील सर्व उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. अधिकृत घोषणा सर्व ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचे दिवशी होणे बाकी आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSecond Time He is elected as Sarpanchटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share187SendTweet117
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.