• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटी वाचविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

by Manoj Bavdhankar
December 6, 2022
in Maharashtra
328 3
0
ST Contract workers want justice

ST Contract workers want justice

644
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज ठाकरेंकडे केली लक्ष घालण्याची विनंती

गुहागर, ता. 05 : एस.टी.च्या संप काळात महाराष्ट्रातील 800 चालकांनी महामंडळाने  सांगितलेले कर्तव्य पार पाडले. मात्र संप मिटल्यावर, महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांना सहकार्य केले त्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली आहे. तरी महाराष्ट्रातील 800 कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा. (ST Contract workers want justice) अशी विनंती करणारे निवेदन विकास जाधव आणि विनायक भोसले  यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरेंना Guhagarला दिले.

ST Contract workers want justice

या निवेदनात म्हटले आहे की, शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी दिर्घकाळ संप केला.  या काळात वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी रा. प. महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने महामंडळाच्या नियमानुसार कामगारांची नेमणूक केली नेमणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ८०० चालकांनी कमी पगार असुनही, इमानदारीने आपले कर्तव्य बजाविले.  बदली चालक नसताना, विना वाहक, 80 ते 90 प्रवासी घेऊन, जीवाची पर्वा न करता बसेस चालविल्या. ‍ST Contract workers want justice

Special Trains for Diwali from Guhagar Agar
ST Contract workers want justice (Filed Photo)

एस.टी.ला संपकाळात मदत करणारे कंत्राटी चालक एस. टी. महामंडळ कधीतरी आपल्याला सेवते घेईल अशी आशा लावून बसला आहे. राज्य सरकारने कोरोना काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी नर्स यांना कायम स्वरूपी सामावून घेण्याची घोषणा केली आहे.  मग शासन असा भेदभाव करत आहे.  एस.टी. वाचविण्यासाठी राज्य सरकार, एस.टी. महामंडळ संकटात असताना आम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल महामंडळाने विचार करावा. ST Contract workers want justice

ST Contract workers want justice: (Filed Photo) आझाद मैदानावर आंदोलन करणारे कर्मचारी

तरी आपणही या विषयात लक्ष घालून, आमच्या समस्या कायम स्वरूपी सोडवून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आणि आमच्यावर आलेली उपासमारीची वेळ दूर करण्याचा प्रयत्न करावा. हि पूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी चालकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. असे निवेदन विकास जाधव आणि विनायक भोसले  यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरेंना दिले. ST Contract workers want justice

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarST Contract workers want justiceटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share258SendTweet161
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.