डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Guhagar News: “एमआयटी, पुणे” शिक्षणसंस्था (MIT Pune) ‘समूहाच्या एमआयटी स्कूलऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ (Rashtriy Sarapanch Sansad) ची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिह्यातील गुहागरचे सामाजिक कार्यकर्ते श्री. सुहास सातार्डेकर यांची या सरपंच संसदेचे ‘महाराष्ट्र राज्य – कोकण विभाग समन्वयक’ या पदावर नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री (Central State Minister) डॉ. भारतीताई पवार (Dr. Bharatitai Pawar) यांच्या हस्ते श्री. सुहास सातार्डेकर यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आले. Rashtriy Sarapanch Sansad
पुणे येथील एमआयटीच्या ‘श्री संत ज्ञानेश्वर सभागृहा’त १८ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या (Rashtriy Sarapanch Sansad) महाराष्ट्र राज्यातील पदाधिका-याचे दोन दिवसीय अधिवेशन व नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारमध्ये ‘आरोग्य व कुटुंब कल्याण’ विभागाच्या राज्यमंत्री असलेल्या डॉ. भारतीताई पवार ह्या उद्घाटक व प्रमुख अतिथी होत्या. ‘एमआयटी, पुणे‘ शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष, ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चे प्रणेते श्री . राहुल कराड अध्यक्ष स्थानी होते. महाराष्ट्र राज्याचे ‘वन’ विभागाचे मंत्री (Forest Minister) व ज्येष्ठ नेते श्री. सुधीरभाऊ मूनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी यावेळी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. (Rashtriy Sarapanch Sansad)

यावेळी व्यासपीठावर सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक व राष्ट्रीय समन्वयक श्री. योगेश पाटील, सहसमन्वयक श्री. प्रकशराव महाले, राज्य कार्यवाह श्री. व्यंकटेश जोशी, राज्य संघटक डॉ. नामदेव गुंजाळ, ग्रामविकास तज्ञ समिती समन्वयक श्री. बाजीराव खैरनार, जिल्हा परिषद महिला सदस्य समिती समन्वयक सौ. सरिताताई गाखरे व “एमआयटी स्कूल गव्हर्नमेंट” चे संचालक डॉ. गीरीसन हे उपस्थित होते.
राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेमध्ये गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय महत्त्वाचा घटक आहे. सरपंच हे केवळ एक पद नाही, सरंपच हा सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे. गावाच्या विकासात सरपंचांनी कृतीशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे. गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्वाची आहे. सरपंचांनी गावाचे नेतृत्व करत असताना केंद्राच्या व राज्याच्या विविध योजना प्रभावीपणे समजून घेऊन गावकर्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. सरपंच हे केवळ पद नाही, तर कृतीशील नेतृत्वाची अपेक्षा त्यामागे आहे. त्यातूनच गावाची प्रगती होणार आहे.असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. (Rashtriy Sarapanch Sansad)
राहुल कराड म्हणाले, देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान करायची असेल तर एमआयटी सारख्या सामाजिक बांधीलकी जपणार्या शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेणे आणि अशा प्रयत्नांचे नेतृत्व करणे आवश्यक वाटले, या भूमिकेतून राष्ट्रीय सरपंच संसद हा उपक्रम सुरू केला आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय सरपंच संसद, राष्ट्रीय शिक्षण परिषद हे उपक्रम त्याचाच एक भाग आहेत. शिक्षण एकांगी न राहता, ते समाजाच्या प्रत्येक घटकाशी, त्याच्या समस्यांशी, प्रगतीशी जोडले जावे, हा आमचा प्रयत्न आहे. येथील शिक्षणातून समाजाप्रती संवेदनशील आणि कृतीशील नागरिक घडावेत, हा उद्देश आहे. (Rashtriy Sarapanch Sansad)
‘अभिनव फार्मर्स क्लब’चे (Abhinav Farmers Club) अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर बोडके, “जेएसडब्लू स्टील कंपनी”च्या सी. एस. आर. विभागाचे (JSW Steel CSR Dept.) प्रमुख श्री. अनिल दधीच व एमआयटीच्या रुरल इमर्शन प्रोग्रामच्या (Rural Immersion Program) समन्वयक डॉ. नीलम पंडित यांनी या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. (Rashtriy Sarapanch Sansad)
देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरुपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे आणि त्यांना ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वी पणे राबवता यावी यासाठी सहाय्यभूत होतील असे विविध उपक्रम अभ्यासपूर्वक राबवणे हे ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे विविध उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या ३४ ग्रामीण व ०२ शहरी जिह्यात यशस्वीपणे राबवता यावेत यासाठी एकूण ३६ जिल्यातून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या सहकाऱ्यांचे मोठे नेटवर्क संघटीत करण्यात आले आहे.
निवड करण्यात आलेल्या सहकाऱ्यांना या अधिवेशनात प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आली.
कोकण विभाग : एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदे’चे कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. संतोष राणे, समन्वयक श्री. सुहास सातार्डेकर, महिला समन्वयक सौ. वंदनाताई दराडे, महिला संघटक सौ. मंगलाताई बडे.
पुणे विभाग : अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, समन्वयक श्री. प्रा सुहास पाटील, महिला समन्वयक श्रीमती भाक्तीताई जाधव, महिला संघटक डॉ. वैशालीताई शिंदे
नाशिक विभाग : अध्यक्ष श्री. संजय भांबर, समन्वयक श्री. सुनील दराडे, महिला समन्वयक सौ. रोहिणीताई नायडू, महिला संघटक आर्की. अमृताताई पवार
औरंगाबाद विभाग : अध्यक्ष श्री. भाऊसाहेब घुगे, समन्वयक श्री. गोपाळराव ईजळीकर, महिला समन्वयक सौ. सुमनताई भांगे, महिला संघटक सौ. इंदुमती आघाव
नागपूर विभाग : अध्यक्ष श्री. विनय दाणी, समन्वयक श्री. संजय गजपुरे, महिला समन्वयक सौ. अनिताताई दियेवार, महिला संघटक सौ. भावनाताई चाम्भारे
अमरावती विभाग : अध्यक्ष श्री. अभय खेडेकर, समन्वयक श्री. अमोल ढोणे, महिला समन्वयक प्रा. वर्षाताई निकम, महिला संघटक श्रीमती. मंदाकिनी पाटील
यावेळी पुणे जिल्हा महिला समन्वयक श्रीमती भावनाताई थोरात यांसह महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील पुरुष व महिला शाखेचे अध्यक्ष, जिल्हा समन्वयक, जिल्हा संघटक, जिल्हा सहसमन्वयक, जिल्हा सह्संघटक , महनगर व नगर समन्वयक तसेच पुणे जिह्यातील सर्व तालुक्यांच्या सर्व महिला पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित होत्या. (Rashtriy Sarapanch Sansad)
सरपंच संसदेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. अजय महाडिक, समन्वयक श्री प्रभाकर खानविलकर व संघटक श्री. सौरभ जोगळे यांनी या नियुक्तीबद्दल श्री. सुहास सातार्डेकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे. (Rashtriy Sarapanch Sansad)
