गुहागर : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेच्या नेरूळ नवी मुंबई या शाखेचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शुभारंभ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. Branch Office in Nerul
आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सभासदांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसस्थेच्या १७ शाखा कोकण विभाग कार्यक्षेत्रात आहेत. संस्थेची रत्नागिरी जिल्हयाबाहेर ही पहिली शाखा
सुरू करण्यात आली असून नोकरी व व्यवसायानिमित्त ठाणे व नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेल्या कोकणातील असंख्य कुटुंब यांना आर्थिक सहकार्य करून संस्थेच्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी केले.Branch Office in Nerul
संस्थेच्या शाखा रत्नागिरी जिल्हयाच्या बहुतांश तालुक्यांमध्ये कार्यरत असून या शाखांचे माध्यमातून सभासद व ग्राहकांना सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संस्थेने सिबीएस प्रणाली कार्यान्वित केली असून त्याव्दारे संस्थेच्या सभासद व ग्राहकांना जलद व सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हयातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकीक प्राप्त केला असून संस्थेमध्ये सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता व व्यावसायिकता यानुसार कामकाज सुरू आहे. त्यामुळे संस्थेने सभासद व ठेवीदार यांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेच्या नेरूळ शाखेला सभासद, ठेवीदार व ग्राहक यांचा चांगला प्रतिसाद व सहकार्य मिळेल असा विश्वास श्री. आरेकर यांनी व्यक्त केला. Branch Office in Nerul
यावेळी नेरूळ नवी मुंबई परिसरातील अनेक प्रतिष्ठीत
नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नेरूळ शाखा शुभारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री हेमचंद्र हळदणकर, संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरूण पाटील, पराग आरेकर, उदय वेल्हाळ संचालिका सौ. स्मिता आरेकर व श्रीम. प्रज्ञा नरवणकर तसेच अँड पंकज दहिबांवकर, गायत्री दहिबांवकर, डॉ. समीर पिलणकर, रागिणी आरेकर, पूजा आरेकर, डॉ. राजमती पिलणकर, प्रशांत कदम संस्थेचे सचिव संदिप रहाटे, कर्मचारी सिध्देश सुर्वे व इतर कर्मचारी तसेच संस्थेचे अनेक हितचिंतक उपस्थित होते. Branch Office in Nerul

