• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात कौमी एकता सप्ताह संपन्न

by Ganesh Dhanawade
November 28, 2022
in Guhagar
132 1
0
विदयार्थ्यांनी क्षमता ओळखुन प्रयत्न करावा -स्वप्निल माने
259
SHARES
739
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालय नुकताच कौमी एकता सप्ताह कार्यक्रम मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्री. एम. ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.

एकता सप्ताह कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध स्त्री वेशभूषा सादर करून एकता व समता या मुल्यांचा संदेश दिला.
कौमी एकता सप्ताह कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. मनिषा जाधव यांनी केले. राष्ट्रगीत व देशभक्तीपर सामूहिक गीत विद्यार्थ्यांनी सादर करून राष्ट्रप्रेम व देशभक्ती मूल्यांचे महत्व कार्यक्रमातून सांगितले. भारतमाता, महाराणी येसूबाई, जिजामाता, ताराबाई, गुजराती स्त्री, कोळी स्त्री भगिनी, महाराष्ट्रीयन महिला अशा वेशभूषा सादर करून वेशभूषा सादर करण्याचा हेतू मनोगतातून व्यक्त करून एकता व समता ही मूल्ये देशात जोपासली जात आहेत हा संदेश दिला.

प्रा. दिनेश पवार व कलाशिक्षक सुनील मेटकरी यांनी कौमी एकता सप्ताह कार्यक्रमाचा उद्देश, एकता – समता व बंधूता ही जोपासली जाणारी मूल्ये, भारतातील संस्कृती, विविधतेतून एकोपा आदी विषयांनुसार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक श्री.एम. ए. थरकार यांनी विविध वेशभूषा सादर केलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून कौमी एकता सप्ताह कार्यक्रमाचा हेतू, राष्ट्रीय एकता, विविधतेतून जपली जाणारी एकता – बंधुता – समता व न्याय ही मूल्ये, विविध कार्यक्रम उपक्रमातून एकता व समता या मूल्यांची शिकवण, देशाला लाभलेला इतिहास आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख श्री. व्ही.डी. पाटील , जी. डी. नेरले, सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस. चव्हाण , प्रा. श्री. एस.आर.पवार, शिक्षक एस.वाय. भिडे, एस. एम. आंबेकर, सौ. एम. पी. वैद्य आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. वाय. भिडे यांनी तर प्रा.एस.आर. पवार यांनी उपस्थित शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Tags: Ekata SaptahGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.