• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी प्रशांत पालशेतकर

by Guhagar News
November 28, 2022
in Maharashtra
122 1
0
आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी प्रशांत पालशेतकर
240
SHARES
685
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण (ओंकार रेळेकर) : गुहागर तालुक्यातील पालशेत गावाचे सुपुत्र प्रशांत पालशेतकर यांची आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. मुंबईसह महाराष्ट्रात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून आर्यन एज्युकेशन सोसायटीची ओळख आहे.

दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२७ पर्यंत कार्यकालासाठी आर्यन एज्युकेशन सोसायटी, मुंबई या संस्थेच्या संचालक पदांसाठी रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत आर्यन उत्कर्ष पॅनल तर्फे उद्योजक प्रशांत पालशेतकर निवडणूक लढवत होते. मात्र त्यांच्या विरुद्ध एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले.

प्रशांत पालशेतकर हे गुहागर तालुक्यातील पालशेतचे आहेत. पालशेत मधील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाचे ते चेअरमन आहेत. प्रशांत पालशेतकर मुंबईत उद्योजक म्हणून परिचित आहेत. हुशार परंतु आर्थिक स्थिती नसल्याने शिक्षण घेता येत नाही अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ते प्रोत्साहन देतात. आवश्यक ती मदत करतात. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल मुंबईसारख्या शहरात घेतली गेली.आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी प्रशांत अनंत पालशेतकर यांची निवड बिनविरोध झाली. यामुळे पालशेत गावाची प्रतिष्ठा देखील वाढली आहे.

निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे.

श्री.गांगण गिरीश विजय पद विश्वस्त बिनविरोध.

श्री. उमराळे भरत रघुनाथ पद विश्वस्त बिनविरोध.

श्री. पालशेतकर प्रशांत अनंत पद विश्वस्त बिनविरोध.

श्री. किशोर रामचंद्र खरे पद खजिनदार मिळालेली मत २५८

श्री. जयंत विष्णु दांडेकर पद सं.स कार्यवाह मिळालेली मत २२५

श्रीमती पाटील (राऊत) विपुला अनिरूध्द पद सं.स कार्यवाह मिळालेली मत २५०

श्री. भास्कर(अमोद) यशवंत उसपकर पद पेट्रन् असोशीएट मिळालेली मत ४७,

श्री. केदार शिवकुमार काळे पद पेट्रन् असोशीएट मिळालेली मत ४२,

श्री. आवारी राजेंद्र माधव पद शिक्षक प्रतिनिधी आर्यन हायस्कूल मुबंई .बिनविरोध

श्रीमती ठाकूर प्रज्ञा संजिव पद शिक्षक प्रतिनिधी म.नी दांडेकर हायस्कूल पालघर .बिनविरोध

श्री. शिंदे रावसाहेब नाना पद शिक्षक प्रतिनिधी शारदासदन, मुंबई बिनविरोध.

श्री. प्रभाकर बाबुराव दाते पद शिक्षक प्रतिनिधी पूर्व प्राथमिक वनिता विद्यालय मुबंई .बिनविरोध

श्री. उपेद्र मोरेश्वर घरत पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४७

श्री. कमलेश भगवानदास वारैया पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४३

श्री. परेश चद्रकांत पाटील पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १३०

श्री संतोष अशोक चुरी पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४५

आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या नव्या संचालक मंडळामध्ये प्रशांत पालशेतकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि अमोद उसपकर यांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल पालशेत गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पालशेतकर आणि मित्रमंडळी यांनी प्रशांत पालशेतकर यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrashat Palshetkarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.