• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमधील चौघांची उमेदवारी

by Mayuresh Patnakar
November 27, 2022
in Ratnagiri
301 3
0
गुहागरमधील चौघांची उमेदवारी
592
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण अर्बन निवडणूक, 25 डिसेंबरला मतदान

गुहागर, ता. 26: चिपळूण अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी (Chiplun Urban Election) गुहागर (Guhagar) तालुक्यातील चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी एकूण 39 अर्ज आले आहेत. त्यापैकी महिलांच्या दोन जागांसाठी केवळ दोनच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Chiplun Urban Election 9 वर्षांनी

कोकणातील लोकप्रिय आणि सहकार क्षेत्रातील एक यशस्वी बँक म्हणून चिपळूण अर्बन बँकेची ओळख आहे. या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल 9 वर्षांनी होत आहे.

15 जागांसाठी निवडणूक
सर्वसाधारण मतदारसंघ चिपळूण तालुका 9 जागा व चिपळूण तालुक्याबाहेरील 1 जागा, महिला प्रतिनिधी 2 जागा, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग  यासाठी प्रत्येकी 1 जागा असे एकूण 15  संचालक निवडून द्यायचे आहेत.

Chiplun Urban Election

संचालक मंडळासाठी 25 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.  या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती. सोमवार 28 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी 29 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 14 डिसेंबरला निवडणूक चिन्ह वाटप होईल. 25 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.  27 डिसेंबरला मतमोजणी होवुन निकाल जाहीर केला जाईल.

39 उमेदवारांना उमेदवार रिंगणात
या निवडणुकीत 15 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान संचालक मंडळातील  एक संचालक सोडून बाकी सर्व संचालकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय 25 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला संचालकांच्या 2 जागांसाठी विद्यमान अध्यक्षा  आणि गौरी रेळेकर या दोघांचेच उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे या दोन जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यावर सोमवारी नामनिर्देशन पत्रांच्या छाननी नंतर शिक्कामोर्तब होईल.

गुहागरमधुन चार अर्ज
गुहागर Guhagar तालुक्यातील विद्यमान संचालक अजय तथा धनंजय खातू, प्रशांत शिरगावकर यांच्या सह पंकज बिर्जे व गोविंद तथा किरण खरे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पंकज बीर्जे हे कै. भालचंद्र तथा आप्पा बीर्जे यांचे सुपुत्र. एकेकाळी गुहागरच्या सहकार क्षेत्राचे नेतृत्व आप्पा बीर्जे करतं. पालशेत विकास सोसायटीचे अध्यक्ष असलेले जिल्हा मध्यवर्ती बँक, खरेदी विक्री संघ, चिपळूण अर्बन बँकेत ते अनेक वर्षे संचालक होते. त्यांच्या पश्चात पंकज बीर्जे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.
गोविंद तथा किरण खरे हे याच बँकेतून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले. बँकेत सेवा करताना गुहागर व चिपळूण तालुक्यातील शाखांमध्ये त्यांनी काम केले आहे. गुहागर मधील श्री दुर्गादेवी देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत.  देवस्थान हे समाजाचा आधार असले पाहिजे. समाजाला दिशा देणारे आणि समाजाच्या विकासात योगदान देणारे असले पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून त्यांनी दुर्गादेवी देवस्थानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम घेत असतात. भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

Tags: Chiplun Urban ElectionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share237SendTweet148
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.