नगराध्यक्ष राजेश बेंडल, बदल केलेला आरखडा प्रसिध्द करु
गुहागर, ता. 23 : जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शासन यंत्रणेची जागा सुरक्षित ठेवून, केवळ सामान्य जनतेच्या तुटपुंज्या जमीनी आरक्षित करुन विकास आराखडा बनला आहे. अशा प्रकारे सामान्य जनतेला भरडून तयार होत असेल तर तो आम्ही का स्विकारायचा. असा प्रश्र्न नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आज उपस्थित केला. Development Plan of Guhagar


Development Plan of Guhagar
गुहागर शहराचा विकास आराखडा (Development Plan of Guhagar) समजून घेण्यासाठी गुहागर नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा आज (ता. 23 नोव्हेंबरला) बोलाविण्यात आली होती. या सभेमध्ये बोलताना नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, 30 मिटर रुंदीचा सागरी महामार्ग (Costal Highway) शहरातील मुळ रस्ता वगळून शहराच्या मधोमध घेतला आहे. शहराच्या पश्चिमेला सीआरझेडच्या मर्यादा (CRZ Limitations) आहेत. पुर्वेला डोंगर आहे. त्यातच शहरामधुन जाणाऱ्या महामार्गामुळे शहराचे निवासी आणि शेती बागायतीचे क्षेत्र कमी होत आहे. मुळात कोकणातील जनतेच्या मालकीची तुटपुंजी जमीन आहे. त्यातच पुन्हा आरक्षणे, रस्ते आणि महामार्ग आले तर लोकांना घरे बांधण्यासाठी जागाच उरणार नाहीत. या विकास आराखड्यात समुद्रालगत असलेले वन विभाग, बंदर विभागाचे क्षेत्रच दाखविण्यात आलेले नाही. ही जागा शासनाने सागरी महामार्गासाठी घेतली तर खऱ्या अर्थाने पर्यटन वाढेल. पण शासनाच्या जागा विकासासाठी घेतल्या गेल्या नाहीत. म्हणजे जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची जागा सुरक्षित ठेवून सामान्य जनतेला भरडून विकास आराखडा तयार होत असेल तर तो आम्ही का स्विकारायचा. आम्हाला कोणाचेही नुकसान न होता विकास हवा आहे.
माजी उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, स्वच्छता व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रसाद बोले, माजी बांधकाम सभापती माधव साटले यांनी देखील सध्या लागवडीखाली असलेल्या शेतांमधील आरक्षणाला, अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीला विरोध केला. Development Plan of Guhagar
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले की, सागरी महामार्ग हा प्रस्तावित आहे. त्यामुळे पूर्वी प्रसिध्द झालेल्या सद्यस्थितीतील जमीन वापराच्या नकाशामध्ये तो दाखविण्यात आलेला नाही. सदर प्रस्तावित महामार्गाचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासाला गती देण्यासाठी विकास आराखडा आवश्यक आहे. शहरांतर्गत रस्ते झाले तर त्या परिसरातील जमिनींचा विकास होईल. धोरणात्मक निर्णयात लोकप्रतिनिधींची भुमिकाच महत्त्वाची आहे. विकास आराखड्याचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी करावा. आवश्यक वाटणारे बदलांबाबत थेट नगररचनाकारांशी चर्चा करावी. नगरपंचायतीने ही प्रक्रिया पूर्ण करुन विहीत मुदतीमध्ये विकास आराखडा जनतेसाठी प्रसिध्द करावा. अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी विशेष सर्वसाधारण सभेला केली. Development Plan of Guhagar
अखेर पुन्हा एकदा विकास आराखड्याचा अभ्यास करुन या आराखड्यात नगरसेवक लोकहितासाठी आवश्यक ते बदल करतील. आवश्यक वाटणाऱ्या बदलांची टिप्पणी तयार केली जाईल. त्याची माहिती नगररचनाकारांना देवून बदल केलेला विकास आराखडा देण्याची मागणी केली. तो आराखडा प्रसिध्द करण्याचा निर्णय आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत झाला. Development Plan of Guhagar
संबधित बातम्या
गुहागरचा विद्यमान जमीन वापर नकाशा (February 2, 2022 in Guhagar)
जनतेला हवा असलेला विकास आराखडा करा (January 22, 2022 in Guhagar)
सहाय्यक आयुक्तांनी विकास आराखडा नगरपंचायतीला सुपूर्त केला तेव्हाचा व्हिडिओ.