• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कारांचे वितरण

by Mayuresh Patnakar
November 23, 2022
in Ratnagiri
107 1
0
Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

210
SHARES
601
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बदल कसा स्वीकारूया विषयावर सौ. दांडेकर यांचे व्याख्यान

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर उपस्थित राहणार असून बदल कसा स्वीकारूया या विषयावर व्याख्यान देणार आहेत. Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

व्याकरणरत्न पदवी संपादन केल्याबद्दल तन्मय हर्डीकर, संस्कृत न्यायशास्त्रातील महापरीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर यांना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परीक्रमा पूर्ण केल्याबद्दल अमोघ पेंढारकर व चैतन्य पाध्ये यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

व्याख्यात्यांचा परिचय

सौ. रेणू दांडेकर या प्रथितयश लेखिका असून त्यांनी लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ३३ वर्षे मराठीचे अध्यापन केले. मराठी भाषांसंदर्भात विशेष काम केले आहे. पाठ्यपुस्तक महामंडळात परीक्षण समितीच्या सदस्य, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेबद्दलचे विशेष मार्गदर्शन त्या करत आहेत. Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

Distribution of awards by Karhade Brahmin Sangh
Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

तन्मय हर्डीकर यांनी माणगाव येथे ऋग्वेदीय स्मार्त याज्ञिकाचे आंशिक अध्ययन केले. नंतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून संस्कृत विषयात पदवी मिळवली. श्रीविद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले. नंतर कांची कामकोटी पिठाधीश श्री विजयेंद्रसरस्वती स्वामीजींच्या सान्निध्यात महापरीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या श्री विद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्यापन करतात. या दांपत्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

सौ. कल्याणी हर्डीकर यांनी महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांच्या पुणे येथील नृसिंहसरस्वती पाठशाळेत न्यायशास्त्राचे अध्ययन सुरू केले व काणकोण येथे वाग्वर्धिनी पाठाशाळेत अध्ययन पूर्ण केले. १६ ऑगस्ट २२ रोजी शृंगेरी येथे श्री विद्युशेखरभारती स्वामीजींच्या उपस्थितीत महापरीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या श्रीविद्या पाठशाळा गोवा येथे त्या न्यायशास्त्राचे अध्यापन करत आहेत.Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या महिला वैज्ञानिक उपक्रमाअंतर्गत बौद्धिक मालमत्ता अधिकार या विषयात पेटंट एजंट ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सौ. शलाका टोळ्ये या 2019 मध्ये नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट झाल्या. टेक्नॉलॉजी इंफॉर्मशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी (मार्च 2022) मध्ये बौद्धिक संपदा क्षेत्रातच कार्यरत राहिलेल्या व्यावसायिक अशा 75 यशस्वी महिलांची दखल घेतली. त्यामध्ये सौ. शलाका टोळ्ये यांचाही समावेश होता. याबद्दल त्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ सन्मानित करणार आहे.Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

अमोघ पेंढारकर हे देवरुखमध्ये औषध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. तसेच गोळवली, संगमेश्वर येथील चैतन्य पाध्ये याने बीकॉम पदवी संपादन केली असून वयाच्या २१ व्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.

समस्त रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

Tags: Distribution of awards by Karhade Brahmin SanghGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.