तालुकाप्रमुख सचिन बाईत, सर्व ग्रामपंचायती मविआच जिंकेल
गुहागर : गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठेका मिळविण्यासाठीच शिंदे गटात गेले असून याचा त्यांनी माझ्याशी वैयक्तिक खुलासा केल्याचे स्पष्टीकरण शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केले आहे. तसेच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील सर्वच २१ ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (MVA will win all Grampanchayats)
गुहागरातील कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याबाबत तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी सर्व गोष्टींचा खुलासा केला. कित्येक शिवसैनिक मला आजही फोन करुन भेटून त्यांचे म्हणणे मांडत आहेत. आम्हाला भास्कर जाधव यांच्यावर विश्वास आहे. कुणावरही राग नाही. आम्हाला पोटापाण्यासाठी काहीतरी कामे किंवा ठेके मिळावीत, यासाठी आम्ही शिंदे गटात गेल्याचे सांगत आहेत. आपले संबंध कायम राहतील असेही बोलत आहेत. त्यातील काहीजण हुशार व समंजस्य आहेत. ते शिंदे गटात जायचे की नाहीत याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यात शिंदे गट टिकणार नाही. या गटात जाणाऱ्यांना त्याचा प्रत्यय नक्की येईल, असे ते म्हणाले.MVA will win all Grampanchayats
मध्यंतरी आमदार भास्कर जाधव यांनी ग्रा.पं. निवडणुकासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी २१ ग्रा. पं. च्या निवडणुका कशा लढायच्या याबाबत ठरविण्यात आले. जेथे बिनविरोधची परंपरा आहे तेथे बिनविरोध व्हाव्यात, जेणेकरुन गावपातळीवर वाद नकोत, अशी समजंस्य भूमिका घेण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे संकेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच दिले आहेत. माजी खा. अनंत गीते यांनीही तसे सांगितले आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे येतील, असा आत्मविश्वास बाईत यांनी व्यक्त केला. MVA will win all Grampanchayats
यावेळी तालुका सचिव विलास गुरव, उपतालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, उपविभागप्रमुख बाबा वैद्य, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ उकार्डे, जांभारी सरपंच अंकुश माटल, गोळेवाडी सरपंच सौ. रेणुका आग्रे, उप महिला आघाडी व शिवणे ग्रा.पं. सदस्य सौ. सुषमा रायकर, माजी शाखाप्रमुख व आवरे उपसरपंच प्रकाश काताळकर आदी उपस्थित होते. MVA will win all Grampanchayats