TWJ फाउंडेशनचा पुढाकार, महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
चिपळूण, ता. 22 : TWJ फाउंडेशन – द सोशल रिफॉर्म्स संस्था आणि पंचायत समिती, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांसाठी दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ या दिवशी कै. लक्ष्मीबाई माटे सभागृह, चिपळूण या ठिकाणी महिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला 375 महिला उपस्थित होत्या. Business guidance to Mahila Bachat Gat
मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूण मतदासंघाचे आमदार श्री. शेखर निकम सर, सौ. पुजा निकम यांच्यासह पंचायत समिती, बँक, उमेद, जिल्हा उद्योग केंद्र आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. Business guidance to Mahila Bachat Gat

Business guidance to Mahila Bachat Gat
मार्गदर्शन करताना आमदार श्री. शेखर निकम म्हणाले की, महिला बचत गटांना व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रशासनाचे नेहमीच सहकार्य असेल. सौ. पूजा निकम यांनी महिलांना वेगवेगळे व्यवसाय कसे करता येतील या विषयी मार्गदर्शन केले.Business guidance to Mahila Bachat Gat
उमेद अभियानाचे प्रशासकीय अधिकारी श्री. अमोल काटकर सर यांनी महिला बचत गटांनी कोणकोणते व्यवसाय केले आहेत याविषयी माहिती सांगितली. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक भांडवल विषयक मार्गदर्शन बँक ऑफ इंडिया, रत्नागिरीचे लीड बँक मॅनेजर श्री. पाटील सर यांनी केले. त्यांनी महिलांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी श्री. अमर गायकवाड सर यांनी जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत सुरू असलेल्या कर्ज योजनांची माहिती दिली. कार्यक्रम संपल्यानंतर इच्छुक महिलांना एकत्र करून जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी अमर गायकवाड यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे अर्ज भरुन घेतले. Business guidance to Mahila Bachat Gat

TWJ फाउंडेशनचे संचालक श्री. प्रसन्न करंदीकर सर यांनी TWJ ग्रुप ऑफ कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांची ओळख करून दिली. या कंपन्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, TWJ फाउंडेशन समाजात कोणत्या विषयात कसे काम करते, याही विषयी सखोल माहिती दिली. पुढील काळात महिलांना बचत गटांच्या विकासासाठी आवश्यक असणारे सहकार्य TWJ फाउंडेशन करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. TWJ फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या महिलांसाठी आरोग्य सेवा संदर्भात चिकित्सा डायग्नोस्टीक विषयी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा जाधव यांनी माहिती दिली. Business guidance to Mahila Bachat Gat

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, पंचायत समिती चिपळूणच्या गट विकास अधिकारी सौ. पाटील मॅडम माजी सभापती सौ. पूजा निकम, TWJ फाउंडेशनचे संचालक श्री. प्रसन्न करंदीकर, उमेद अभियानाचे प्रशासकीय अधिकारी श्री. अमोल काटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी अमर गायकवाड, बँक ऑफ इंडियाचे पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती चिपळूणचे अधिकारी, TWJ फाउंडेशन – द सोशल रिफॉर्म्सचे संचालक श्री. प्रसन्न करंदीकर, सल्लागार श्री. हेमंत तांबे, श्री. रविदास कांबळे, श्री. श्रीपाद खेर, श्री. शैलेंद्र चौगुले, श्री. प्रथमेश पोमेंडकर तसेच TWJ असोशिएट, चिपळूण आणि TWJ हॉस्पिटॅलिटी यांनी परिश्रम घेतले. Business guidance to Mahila Bachat Gat
