• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल जि.प.गटात ओबीसी संघर्ष उपसमिती पुनर्गठीत

by Manoj Bavdhankar
November 22, 2022
in Guhagar
148 2
0
OBC Subgroup in Anjanvel ZP

OBC Subgroup in Anjanvel ZP

291
SHARES
831
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अंजनवेल जि. प. गटाच्या झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंजनवेल जिल्हा परिषद गटाची ओबीसी संघर्ष समन्वय उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली. (OBC Subgroup in Anjanvel ZP)

          रानवी ता. गुहागर येथील माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल प्रतिष्ठान सभागृह, येथे अंजनवेल गटातील ओबीसी समाविष्टीत सर्व समाजाच्या मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश खैर यांनी सर्व ओबीसी बांधवांचे स्वागत केले. (OBC Subgroup in Anjanvel ZP)

नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले की, ओबीसी बांधव कुठल्याना कुठल्या पक्षाशी बांधिल असतोच. त्यावर कुणाचे बंधने नाहीत. मात्र, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी किंवा मागण्यांसाठी जेव्हा लढा पुकारला जातो तेव्हा ओबीसी बांधवानी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांनी जातीनिहाय जनगणना अद्याप झालेली नाही. जेवढी आपली ओबीसींची लोकसंख्या आहे त्या तुलनेत आरक्षण मिळणे गरजेचे आहे. परंतु ते अजून मिळाले नाही. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समन्वय समिती सतत लढा देत आहे. त्या लढ्यामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी सहभाग देणे गरजेचे आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात येते की काय ही स्थिती होती. परंतु ओबीसी बांधवानी संघर्ष केल्यामुळे ओबीसी आरक्षण शाबूत राहू शकले. “ओबीसीची वारी आमदार – खासदारांच्या दारी” ही संकल्पना राबविण्यात आली. या सर्वांच्या दारात जाऊन निवेदने देण्यात आली. परंतु निवेदन देऊन सुद्धा कुणीही विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला नाही किंवा याची दखलही घेतली नाही. इतर मागास वर्गीय आर्थिक महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने तसेच आर्थिक तरतुद होत नसल्याने स्वयंरोजगारासारखे अनेक विषय ठप्प झाले आहेत. ओबीसीचा मतदार म्हणून आजपर्यतच्या राजकर्त्यांनी वापर केल्याची खंत ही त्यांनी शेवटी व्यक्त केली. (OBC Subgroup in Anjanvel ZP)

या बैठकीमध्ये अंजनवेल जि.प. गटासाठी ओबीसी समन्वय समिती गठीत करण्यात आली, यामध्ये महादेव साटले, नितीन घरट, विनायक काणेकर, गौरव वेल्हाळ, शरद आबेंडे, उमेश खैर, संतोष आग्रे, संदिप धनावडे, शरद यादव यांची निवड करण्यात आली.(OBC Subgroup in Anjanvel ZP)

          या बैठकीला गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते, नगराध्यक्ष राजेश बेंडल,, प्रदीप बेंडल, अँड संदिप आग्रे, संतोष आग्रे, महादेव साटले, गौरव वेल्हाळ, नितीन घरट, विनायक काणेकर, समीर धामणस्कर, उमेश खैर, गणेश किर्वे, संदिप धनावडे, अरविंद पालकर, शरद आबेंडे,विनायक आग्रे, गणपत डिंगणकर आदी उपस्थित होते.(OBC Subgroup in Anjanvel ZP)

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOBC Subgroup in Anjanvel ZPटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.