सौ. रेणूका आग्रे; विकासकामांबाबत पालकमंत्र्यांची भेट घेतली
गुहागर : आम्ही कट्टर शिवसैनिक असून भगव्याशी कदापि गद्दारी करणार नाही. आम्ही शेवटपर्यंत आमचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहणार (We are in Thackeray’s Shiv Sena) असल्याची प्रतिक्रिया देत आम्ही शिंदे गटात गेल्याचे वृत्त चुकीचे असून केवळ गावाच्या विकासकामांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती भातगाव गोळेवाडीच्या सरपंच सौ. रेणूका आग्रे यांनी दिली.
सरपंच सौ. आग्रे म्हणाल्या की, गुहागर तालुक्यातील मासू ते भातगाव रस्ता होणेसाठी निवेदन देण्यासाठी आम्ही एकूण ११ सरपंच आणि सदस्य पालकमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी गेलो होतो. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा करण्यात आली नाही. केवळ गावाच्या विकासकामांबाबत चर्चा झाली. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या उद्देशाने गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ठामपणे सांगू शकतो, आम्ही ठाकरे सेनेतच आहोत. आमचे नेते भास्करराव जाधव, उध्दवजी, आदित्यजी ठाकरे आहेत. त्यामुळे आम्ही शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही. वृत्तपत्रात पक्षात गेल्याचे आलेले वृत्त खोटे आहे. कुणीही या वृत्तावर विश्वास ठेऊ नये असा खुलासा महिला आघाडीच्या सुषमा रायकर, सरपंच अंकूश माटल यांनी केला. (We are in Thackeray’s Shiv Sena)
काताळेचे माजी शाखा प्रमूख प्रकाश काताळकर म्हणाले की, एकच ध्यास सामाजिक विकास सेवा समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने पाचेरी आगर येथील गजानन काजरोळकर यांनी मला आवरे फाटा ते भातगाव राईपूल रस्त्याबाबत निवेदन देण्यासाठी मला बरोबर येण्यास सांगितले होते. म्हणून आम्ही गेलो होतो. (We are in Thackeray’s Shiv Sena)
यावेळी तालुकाप्रमूख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव , उपतालुका प्रमूख काशिनाथ मोहिते, उपविभाग प्रमूख विजय वैद्य, जेष्ठ शिवसैनिक के. बी. उकार्डे आदी उपस्थित होते. (We are in Thackeray’s Shiv Sena)
