• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विसापूर शाळेच्या अमृत महोत्सव

by Mayuresh Patnakar
November 21, 2022
in Guhagar
126 1
0
Visapur School Amrit Mahotsav

Visapur School Amrit Mahotsav

247
SHARES
706
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील विसापूर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेला 23 नोव्हेंबर 2022 रोजी 75 पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शाळेचा अमृत महोत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.Visapur School Amrit Mahotsav

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील विसापूर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेचा अमृत महोत्सवी दिवसानिमित्त 23 नोव्हेंबरला सकाळी 11.00 सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 ते 5 मनोरंजनात्मक खेळ आणि रात्रौ. 8.00 वा. विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन आणि समोरोप असे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. Visapur School Amrit Mahotsav

गेल्या 75 वर्षात हजारो विद्यार्थी या शाळेतून विद्यार्जन करुन पुढील शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी परगांवी गेले. जीवन शिक्षणांचे प्राथमिक संस्कार या शाळेने दिले. या संस्कारांच्या बळावर अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपले जीवन सुखकर केले. या शाळेच्या अनेक आठवणी या विद्यार्थ्यांच्या मनात आजही जाग्या आहेत. शाळेच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. बालपणातील आपल्या आठवणींना उजाळा मिळावा. यासाठी अमृत महोत्सवी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शाळेतून शिकून गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन अमृत महोत्सव कमिटीचे अध्यक्ष धोंडू बेंडल आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश पडवळ यांनी केले आहे. Visapur School Amrit Mahotsav

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVisapur School Amrit Mahotsavटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share99SendTweet62
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.