नाविन्यपूर्ण शेतीतून उत्पन्न वाढवावे – प्रमोद केळस्कर
गुहागर, ता. 18 : पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य आहे. अशा नाविन्यपूर्ण (innovative agriculture) उपक्रमातून, प्रयोगातून शेतकऱ्यांनी (Farmer) आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी वेळंब येथे केले. Watermelon Cultivation
पं.स. गुहागरच्या कृषी विभागाच्या वतीने गुहागर तालुक्यातील वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक (Watermelon Cultivation Training and Demonstration) आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम वेळंबमधील शेतकरी संजय गुरव यांच्या कलिंगड लागवडीच्या शेतात घेण्यात आला. Watermelon Cultivation
या उपक्रमाबाबात कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर म्हणाले की, कलिंगड हे पिक इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न देणारे नगदी पिक (Cash Crop) आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कलिंगडाचे उत्पन्न घ्यावे. शेतकऱ्यांना या पिकाची लागवड Watermelon Cultivation कशी करावी. कोणती काळजी घ्यावी. खते औषधे कोणती वापरावीत. पाणी कसे द्यावे. याबद्दल माहिती होण्यासाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक व प्रशिक्षण (Training and Demonstration) उपक्रमाचे वेळी कलिंगड लागवड करणारे शेतकरी श्री. चव्हाण (रा. मढाळ), कोतळूक येथील लक्ष्मण कुंभार, विजय माळी यांनी अनुभव कथन केले. Watermelon Cultivation
सरपंच समिक्षा बारगोडे यांनी पंचायत समितीने वेळंब येथे कलिंगड लागवडीबाबत प्रात्यक्षिक (Watermelon Cultivation Training and Demonstration) आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल कृषी विभागाचे आभार व्यक्त केले. शेतीबाबत agriculture आमच्या शेतकऱ्यांना असेच सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे. अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
या उपक्रमाचे वेळी वेळंबच्या सरपंच समिक्षा बारगोडे, उपसरपंच श्रीकांत मोरे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम गाडे, सुरेश जाधव, जयश्री जाधव, श्वेताली घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, प्रिया जाधव, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे, ग्रामसेवक आर. बी. राठोड, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण कुंभार, शेतकरी संजय गुरव, संदिप गुरव, विजय माळी, रविंद्र कारकर, चव्हाण, विजय रांजाणे, अनिल देवस्थळी, गोपाळ मोरे, कुणाल बारे, पंकज निर्मळ, मेघश्याम गुरव, आदी शेतकरी उपस्थित होते. ग्रामसेवक राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. Watermelon Cultivation
Tags : innovative, agriculture, Watermelon, Cultivation, Training, Demonstration, farmer, कलिंगड लागवड, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, नगदी पिक, cash crop, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Watermelon Cultivation,