गुहागर : तालुक्यातील वरवेली ग्रा.प.चे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने वरवेली गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.Honored by Varveli village
सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच धनश्री चांदोरकर, ग्रा.प. सदस्य जगन्नाथ शिंदे, चंद्रशेखर विचारे, दिव्या किर्वे, श्रावणी शिंदे, गणेश रांजाणे, लक्ष्मी विचारे, ग्रामसेवक महेंद्र भुवड यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष राजाणे, दिपक विचारे, अरुण भुवड, वैभव पवार, बाळकृष्ण पवार, पत्रकार गणेश किर्वे, माजी सरपंच प्रतिक्षा किर्वे, दशरथ किर्वे, प्रशांत विचारे, जितेंद्र विचारे, संदीप पवार, अरुण आगरे, नारायण आगरे, सुजित शिंदे, संतोष अवेरे, उदय रावणंग , नामदेव रावणंग व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.Honored by Varveli village
यावेळी बोलताना सरपंच पुनम रावणंग म्हणाल्या की, माझ्यावर गावाने विश्वास ठेवून बिनविरोध सरपंचपदी निवड केली. गेली पाच वर्षे आदर्शवत काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. सरपंचपदाच्या कार्यकाळात उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. यापुढील काळात देखील गावाची सेवा करत राहणार असे त्यांनी सांगितले.Honored by Varveli village
