पटवर्धन रंगभुमीच्या दुरूस्तीसाठी गोविंदप्रेमींचे योगदान
गुहागर, ता. 13 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या आर्थिक साह्यातून उभ्या राहिलेल्या रंगभुमीच्या दुरुस्तीसाठी गायक अभिनेते मुकुंद मराठे (Singer & actor Mukund Marathe) यांनी प्रयत्न केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाट्य संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलावंतानी सुमारे 1 लाखाची देणगी (1 Lakh Donation) या रंगभुमीच्या कामासाठी दिली.
गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिराशेजारी रंगमंच (Rangbhumi) आहे. या रंगभुमीवर (Theater) स्वातंत्र्यपूर्व काळापासून संगीत नाटके (marathiplay) सातत्याने होत असत. मराठी रंगभुमीवरील 25 हजारहून अधिक संगीत नाट्यप्रयोगांना स्वरांकित करणाऱ्या पं. गोविंदराव पटवर्धन यांनी या रंगमंचावर ग्रामस्थांच्या संगीत नाटकांनाही अनेक वर्ष साथ संगत केली. त्यांनीच वडिलांच्या स्मरणार्थ या रंगमंचाचा 1977 मध्ये जीर्णोध्दार केला. तेव्हा पासून ही रंगभुमी विठ्ठल गोपाळ तथा अण्णा पटवर्धन रंगमंच म्हणून ओळखली जावू लागली.
1 Lakh Donation
यावर्षीच्या पावसात रंगमंचावरील लाकडी सांगाडा कोसळला. त्याबरोबर अनेक वर्षांपूर्वी बांधलेले संपूर्ण छतही कोसळले. मंदिर संवर्धनाच्या कामात लाखो रुपये खर्च झालेल्या देवस्थानसमोर रंगभुमीची दुरुस्तीसाठी निधी नव्हता. योगायोगाने याचवेळी मुकुंद मराठे खासगी कामाकरीता गुहागरला आले होते. कोपरी नारायण देवस्थानच्या पंच कमिटीने मराठे यांना रंगभुमीवर नेले. अडचणी सांगितल्या. आपल्या गुरुच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रंगभुमीसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे हा विचार घेवून मुकुंद मराठे ठाण्याला गेले. संगीत नाटकांमध्ये (Musical Drama) काम करणाऱ्या, गोविंदरावांना गुरु मानणाऱ्या अनेक कलावंतांना (Theater artists) ही गोष्ट सांगितली. मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कलावंतांनी देवस्थानला आर्थिक साह्य केले. आज सुमारे 80 हजार रुपयांची देणगी या कलावंतानी बँक खात्यात जमा केली आहे. मुकुंद मराठे यांनी स्वत: 21 हजार रुपयांची देणगी देवस्थानला दिली आहे. (1 Lakh Donation)
याबाबत बोलताना देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर म्हणाले की, कोसळलेल्या रंगभुमीचे काम आम्ही तातडीने सुरु केले होते. फंडात निधी नव्हता. तरीही पंचांचे दायित्व म्हणून स्वखर्चातून निधी उभा केला. याच काळात नारायणाच्या आशिर्वादाने गोविंदरावांना गुरु मानणारे मुकुंद मराठे धावून आले. त्यांच्या आवाहनामुळे निधी मिळाला शिवाय मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर अशी अनेक मंडळी या देवस्थानशी गोविंदरावांच्या प्रेमातून जोडली गेली आहेत. ही आमची मोठी ठेव आहे. (1 Lakh Donation)
Tags : Theater artists, Rangbhumi, Marathi Rangbhumi, नाट्यकलाकार, मराठी रंगभुमी, theaterarts, marathiplay, पं. गोविंदराव पटवर्धन, Musical Drama, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,