• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

by Manoj Bavdhankar
November 9, 2022
in Guhagar
24 0
0
वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता
47
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

करंजा बंदरातील बोटीवर आहे कामाला

गुहागर, ता. 9 :  रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथे बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा 25 वर्षीय युवक बेपत्ता आहे. या युवकाचे नाव ऋतुराज काशिनाथ पावसकर आहे. ऋतुराज मूळचा गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील रहिवासी आहे. तो बेपत्ता असल्याची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Youth missing
ऋतुराज काशिनाथ पावसकर हा वेळणेश्र्वरचा तरुण मूकबधिर आहे. तो उरण तालुक्यातील करंजा गावातील विलास कोळी यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला आहे. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता तो करंजा गावातूनच निघून गेला. विलास कोळी आणि अन्य ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे ऋतुराज काम करत असलेल्या बोटीवरील तांडेल तांडेल तुषार पालशेतकर यांनी उरण पोलीस ठाण्यामध्ये तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. उरण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. Youth missing
ऋतुराज काशिनाथ पावसकर वेळणेश्र्वरमधील असल्याने या गावाचे सरपंच चैतन्य धोपावकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देखील विविध ठिकाणी संपर्क साधून ऋतुराज बेपत्ता असल्याचे कळविले आहे. सदर तरुण कोठे मिळून आल्यास 9326705960, 8879296030, 7350686951 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे Youth missing

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth Missingटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.