• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

by Mayuresh Patnakar
November 7, 2022
in Guhagar
41 0
0
Suicide of young man

Suicide of young man

80
SHARES
228
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेलदूरमध्ये भाड्याच्या खोलीत लावून घेतला गळफास

गुहागर, ता. 07 : प्रतिक्षा कुशा तांडेल (वय 23) रा. वेलदूर खारवीवाडी या तरुणीने भाड्याने घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 6) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे प्रतिक्षाने लिहून ठेवले होते. तिच्या पश्चात आई व भाऊ असे कुटुंब आहे. Young woman commits suicide due to illness

प्रतिक्षा कुशा तांडेल (23 Years Young woman) गुहागर तालुक्यातील वेलदूर खारवीवाडीत आपल्या मामाच्या शेजारी भाडयाची खोली घेवून रहात होती. ती अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटर (Data Operator) म्हणून काम करत असे. कुशा तांडेल हे मुळचे साखरीआगरचे. ते मानसिक रोगी होते. त्यांच्या निधनानंतर प्रतिक्षा आणि तिच्या भावाचे संगोपन आणि शिक्षण आईने घरकाम करुन केले. प्रतिक्षा पदवीधर झाली. तर प्रतिक्षाचा भावाने सिव्हील इंजिनिअरींग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर प्रतिक्षा डाटा ऑपरेटर (Data Operator) म्हणून ग्रामपंचायतीमध्ये नोकरी करु लागली. तर भाऊ खेड येथे नोकरी करत होता. Young woman commits suicide due to illness

Young woman commits suicide due to illness

गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या प्रतिक्षाने वेलदूर खारवीवाडी येथे मामाच्या घराशेजारी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. रविवारी (ता. 6) सकाळी प्रतिक्षा मामाच्या घरी गेली होती. दुपारनंतर पुन्हा आपल्या खोलीवर आल्यावर तिथे खोलीचे दरवाजे व खिडक्या बंद करुन ठेवल्या होत्या. सायंकाळी देखील प्रतिक्षाने दरवाजे खिडक्या उघडल्या नाहीत म्हणून शेजारी रहाणारी नंदीनी जांभारकर हीने प्रतिक्षाला हाका मारल्या. मात्र खोलीतून प्रत्युत्तर न आल्याने नंदीनीने वाडीतील ग्रामस्थांना सांगितले. दरवाजे खिडक्या ठोठावून, हाका मारुनही खोलीतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा जोरात ढकलुन उघडला. त्यावेळी खोलीतील लोखंडी वाश्याला जरीकाढाच्या साडीने गळफास (commits suicide) लावलेल्या स्थितीत प्रतिक्षा दिसली. तातडीने ग्रामस्थांनी तिला खाली उतरवले. कांदा तोंडाला लावून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत प्रतिक्षाचा मृत्यू (dead) झाला होता. Young woman commits suicide due to illness.

तातडीने ग्रामस्थांनी गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क करुन प्रतिक्षाच्या आत्महत्येची (suicide) माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव पवार यांनी घटनास्थळी येवून पहाणी केली. त्यावेळी प्रतिक्षाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये प्रतिक्षाने आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे ( commits suicide due to illness) लिहिले होते. या संदर्भात पोलीसांनी अधिक चौकशी व तपासणी केली तेव्हा 5 दिवसांपूर्वी प्रतिक्षा डॉक्टरांकडे जावून आल्याचे कळले. तसेच खोलीत सुमारे 9 हजार रुपयांची औषधे खरेदी केल्याचा कागदही सापडला. Young woman commits suicide due to illness

पंचनामा, शवविच्छेदन आदी प्रक्रिया पार पाडल्यानंतर पोलीसांनी प्रतिक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर साखरीआगर येथे प्रतिक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Young woman commits suicide due to illness

Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Young woman commits suicide due to illness, Data Operator, dead,

Tags: Data OperatordeadGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYoung woman commits suicide due to illnessटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.