मंडणगड, ता. 06 : समर्थ भंडारी पतसंस्थेला सर्वोतोपरी सहकार्य राहील. असे प्रतिपादन मंडणगडच्या नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी केले. तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पतसंस्थेचा मंडणगड मधील सर्वच घटकांना फायदा होईल. असे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी सांगितले. मंडणगड मधील समर्थ भंडारी पतसंस्थेच्या 16 व्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सौ. बेर्डे आणि श्री. कोकाटे उपस्थित होते. Inauguration of Samarth Bhandari

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंडणगड शाखेचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. मंडणगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. वैभव कोकाटे यांनी श्रीफळ वाढवले तर नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे यांनी फीत कापून शाखा कार्यालयाचे उद्घाटन केले. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी दिपप्रज्वलन केले. पतसंस्थेसाठी जागा देणारे प्रबोध कोकाटे, श्रीधन इंटेरिअरचे मिथिलेश नरळकर यांचा सन्मान प्रभाकर आरेकर यांनी केला. Inauguration of Samarth Bhandari
संबधित बातम्या : बेस्ट चेअरमन पुरस्काराने प्रभाकर आरेकर सन्मानित

पतसंस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देताना प्रभाकर आरेकर म्हणाले की, या पतसंस्थेची वाटचाल पारदर्शकता, व्यावसायिकता, सुरक्षितता व विश्र्वासार्हता या चतु:सुत्रीवर आधारीत आहे. संस्थेचे ठेवी स्वीकारणे व कर्ज वितरण करणे याबाबतचे धोरण निश्चित आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहीली आहे. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असून मंडणगडवासीयांना चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. संस्थेच्या ग्राहकांना एटीएम, आरटीजीएस, एनईएफटी, चेक कलेक्शन यासारख्या सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्या आहेत. Inauguration of Samarth Bhandari
संबधित बातम्या : पारदर्शकात आणि विश्र्वासार्हता जपणारी पतसंस्था

यावेळी नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी संस्थेच्या मंडणगड शाखेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरपंचायतीकडून सर्वोतपरी मदत करण्याचे आश्र्वासन दिले. श्रीपाद (भैय्या) कोकाटे, परकर गुरुजी, देवकर गुरुजी व श्री. जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त करत संस्थेला शुभेच्छा दिल्या. Inauguration of Samarth Bhandari
यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले, अरुण पाटील, विजय जाधव, पराग आरेकर, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. पल्लवी भाटकर यांच्यासह रागिणी आरेकर, आर्यन आरेकर , संस्थेचे कर्मचारी आणि मंडणगडमधील हितचिंतक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप रहाटे केले. Inauguration of Samarth Bhandari
Tags : Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Samarth Bhandari Nagari Patsanstha, Inauguration of Samarth Bhandari,
