• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वरचैतन्याची आबलोलीत रंगणार दिवाळी पहाट

by Ganesh Dhanawade
October 23, 2022
in Guhagar
35 0
0
69
SHARES
196
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चित्र, शिल्प प्रदर्शन आणि समूह गीत गायन, किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन

गुहागर, ता. 23 : स्वरचैतन्य ग्रुप आबलोली (आंबेरे खुर्द) तालुका गुहागर यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या पाचव्या वर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमासोबत चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आणि समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम खोडदे सहाण, खोडदे ग्रामपंचायत जवळ आबलोली, गुहागर या ठिकाणी होणार आहेत.  Ranganar Diwali Pahat in Aabloli

दिवाळीचे औचित्य साधून स्वरचैतन्य ग्रुपचा रंगत कलांची, संगत सुरांची हा कार्यक्रम २४ व २५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता भक्ती-भाव गीतांची मेजवानी, तसेच निलेश धामणस्कर व विश्वनाथ धामणस्कर यांच्या चित्र व शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, त्यानंतर गुहागर तालुका मर्यादित समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चित्र कार्यशाळा व करियर मार्गदर्शन घेतले जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता या दोन दिवशीय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. चित्र व शिल्प प्रदर्शन दोन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होणार आहे. चित्र व शिल्प प्रदर्शन, संगीतमय दिवाळी पहाट व समूहगीत गायन स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ आदी सर्व कार्यक्रम खोडदे सहाण, खोडदे ग्रामपंचायत जवळ आबलोली, गुहागर या ठिकाणी होणार आहे. तसेच किल्ला बनविण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. Ranganar Diwali Pahat in Aabloli

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी गिरीश पांचाळ- ९४०४९६७६२१, संदेश पांचाळ- ९७०२९८९३१८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. Ranganar Diwali Pahat in Aabloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet17
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.