• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“माझा गाव माझा किल्ला” तालुकास्तरीय स्पर्धा

by Ganesh Dhanawade
October 23, 2022
in Guhagar
32 1
0
Guhagar Yuva Sena organizes fort competition
64
SHARES
182
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका मनसे तर्फे आयोजन

गुहागर, ता. 23 :  तालुका मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या संकल्पनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर आयोजित “माझं गाव माझा किल्ला” या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, उत्तेजनार्थ त्याचबरोबर आणखी खास पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. Taluka level competition by MNS

या स्पर्धेसाठी काही नियम ठेवले आहेत. त्यामध्ये बनविण्यात येणाऱ्या किल्ल्याचे ३ फोटो आपल्या नावासह पाठवावेत. (फोटोवर नाव नसल्यास नोंदणी केली जाणार नाही), फक्त २ मिनिटाचा व्हिडिओ असावा, ज्यामध्ये आपल्या नावाचा स्पष्ट उल्लेख असावा. (नावाचा उल्लेख नसल्यास नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही), आपण जो किल्ला सजवला आहे, त्याची माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षकांनी सांगितलेल्या वेळेनुसारच आपल्याला किल्ला पाहणीसाठी ज्या निवडक स्पर्धकांना फोन करण्यात येईल त्यांना उपस्थित राहावं लागेल. तसेच स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे असतील. Taluka level competition by MNS

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कौंढर शाखाध्यक्ष, सचिन जोयशी८१६९०३४४८४, महाराष्ट्र सैनिक, विवेक जानवळकर७७२२००९६४५, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष, राहुल जाधव  ८९७५३४८१२३, म.न.विसेना तालुका अध्यक्ष, सागर शिरगावकर ९५५८३०६००३ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केले आहे. Taluka level competition by MNS

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTaluka level competition by MNSटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet16
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.