श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट ठरवतो, परंतु ती अंमलात आणत नाही.
उदाहरणार्थ, उद्यापासून चहा पिणार नाही असे आपण ठरवतो परंतु पहिल्याच दिवशी कोणी मैत्रिण किंवा मित्र आला तर त्याच्यासोबत आपण चहा घेतो. Happy Life part – 4
आपल्याला माहित असते की मी स्वतः चहा न घेण्याचा संकल्प केलेला आहे, पण तरी देखील आपल्याला आतून चहा पिण्याची इच्छा होते व आपण ती इच्छा मोडू शकत नाही.
आपण ठरवतो की उद्यापासून लवकर उठायचे. झोपताना लवकरचा गजर लावून ठेवतो, आपल्याला जाग पण येते, पण आपण उठून आजूबाजूला बघतो तेव्हा सगळे झोपलेले असतात. मग आपलं मन आपल्याला म्हणतं सगळे झोपलेत तू पण झोपून जा, आणि आपण “त्या” मनाचं ऐकतो. आपलं एक मन आपल्याला सांगत असतं की तू लवकर उठण्याचा संकल्प केलेला आहेस आणि तुला उठायला हवं, परंतु आपण “त्या” मनाचं ऐकत नाही व आपण झोपून जातो.
तुम्ही ठरवता की उद्यापासून तंबाखू खायची नाही. सिगारेट प्यायची नाही, पण ठराविक वेळेला तलफ होतेच. आणि पुन्हा एकदा तुम्ही ठरवलेली गोष्ट होत नाही. Happy Life part – 4
याच्यावर उपाय काय?
मित्रांनो दररोज स्वतःला सांगा की मी एक असामान्य व्यक्ती आहे. माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला माझ्या मध्ये बदल करणे आवश्यक आहे. असामान्य व्यक्ती बनण्यासाठी जे जे करायला हवे ते सर्व मी करणारच.
तुम्ही ठरवलेली गोष्ट /संकल्प साध्य होण्यासाठी योजना (Planning) करा. त्यानुसार प्रामाणिकपणे तयारी करा.
उदाहरणार्थ: सकाळी लवकर उठायचे असेल तर मोबाईल तुमच्या पासून दूर ठेवा. आपल्या जवळ मोबाईल असला की आपण गजर वाजला की लगेच snooze करतो. पुन्हा गजर वाजला की पुन्हा snooze करतो व त्यामुळे आपण वेळेवर उठत नाही.
जर आपण मोबाईल आपल्यापासून थोड्या दूर अंतरावर ठेवला, आपण त्या ठिकाणी जाऊन मोबाईल बंद करू, तुमच्या उठण्याच्या क्रियेमुळे तुमच्यातला आळस निघून जाईल. आणि तरीही पुन्हा झोपावेसे वाटले तर स्वतःला सांगा मी एक असामान्य व्यक्ती आहे . मी आता पुन्हा झोपणार नाही. हळूहळू तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल. Happy Life part – 4
तुम्हाला तंबाखू सोडायची असेल तर तुम्ही तुमच्या पासून दूर कोणत्यातरी बॅगेत किंवा कपाटात तंबाखूची पुडी ठेवा. तुम्हाला तलफ आल्यावर लगेच ती गोष्ट मिळता कामा नये. ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास पडला पाहिजे. मग तुमचे मन हळूहळू ती गोष्ट करण्यापासून दुरावेल.
तुम्हाला योगा किंवा व्यायाम करायचा असेल, तर नक्की तुम्ही काय करणार आहात हे ठरवा. त्याप्रमाणे दररोज दहा मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळू लागेल व तुमचे आरोग्य विषयी ध्येय पूर्ण होईल.
समजा तुम्ही मोबाईल जास्त वेळ बघायचा नाही, असा संकल्प केला असेल तर मोबाईल तुमच्या पासून दूर अंतरावर ठेवा. मोबाईल सतत जवळ असल्यामुळे आपण वारंवार WhatsApp चेक करत असतो. मग आपण युट्युब कडे वळतो. तिथे थोडा टाईम पास झाला की मग आपण इन्स्टा किंवा FB वर जातो. त्यामुळे आपला मोबाईल न बघण्याचा उद्देश सफल होत नाही. त्यासाठी तुमच्या पासून तुमचा मोबाईल नेहमी दूर अंतरावर ठेवा. त्याचे नेट शक्यतो बंद ठेवा, सर्व नोटिफिकेशन चा आवाज बंद ठेवा. म्हणजे तुम्हाला मोबाईल बघण्याची इच्छा होणार नाही. हळूहळू तुमचा मोबाईलचा वापर कमी होऊ लागेल.
तुम्ही अजून एक प्रयोग करू शकता की जो मी नेहमी करत असतो. तो म्हणजे WhatsApp Fast म्हणजे व्हाट्सअप उपवास. महिन्यातून एखादा दिवस असा ठरवा की त्या दिवशी तुम्ही काहीही झाले तरी व्हाट्सअप उघडणार नाही.
मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी करून काय मिळणार आहे. असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मित्रांनो तसं पाहिलं तर काहीच फरक पडणार नाही, परंतु एक होईल तुमच्यामध्ये स्वयंशिस्त (Self Discipline) येऊ लागेल. तुमचा तुमच्या मनावर कंट्रोल येऊ लागेल. याचा फायदा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक व व्यावसायिक ठिकाणी होऊ शकतो आणि तुम्ही जो शब्द दिला आहे, त्या शब्दाचे तुम्ही पक्के आहात हे इतरांना देखील जाणवू लागेल. तुमच्या घरामध्ये, मित्रामध्ये आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर व मान सन्मान मिळू लागेल व एकंदरीतच तुमचे जीवन अधिक सुंदर होऊ लागेल. Happy Life part – 4
तुम्ही तुमच्या कोण कोणत्या एरियावर काम करणार आहात हे अगोदर ठरवा आणि शक्य झाल्यास मला देखील तसे कळवा. तुमच्या मध्ये बदल झालेला मला बघायचा आहे.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -5 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा