जमिन नावावर करुन देण्यासाठी मागितली होती लाच
दापोली, ता. 21 : Talathi was caught red-handed by ACB वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी दापोली येथील सुकोंडी तलाठी अक्षय शिवगोड्डा पाटील (वय 30) याने तक्रारदार यांच्याकडून 10 हजारांची लाच Corruption मागितली होती. त्यापैकी 7 हजार रुपये घेताना अक्षय पाटील याला दुपारी 1.53 च्या सुमारास दापोली नगरपंचायत समोरील रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रांगेहाथ पकडले.


लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडीलांनी मौजे कोंडी येथील जमीन तक्रारदार यांचे नावावर करणेबाबत मृत्युपत्र केले होते. सदरची जमीन तक्रारदार यांचे नावावर होण्यासाठी मौजे कोंडी हे गावाचे कामाची जबाबदारी असलेले सुकोंडीचे तलाठी यांचेकडे अर्ज केला होता. सदरची जमीन तक्रारदाराच्या नावावर करून तसा ७/१२ उतारा देण्याकरीता अक्षय पाटील, तलाठी सजा सुकोंडी ता. दापोली यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रुपये लाच Corruption रक्कमेची मागणी केली होती. Talathi was caught red-handed by ACB


Talathi was caught red-handed by ACB
तक्रारदार यांनी लोकसेवक श्री. अक्षय पाटील यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे दिनांक २१/०९/२०२२ रोजी लाच Corruption रक्कमेच्या मागणीची तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २१/०९/२०२२ रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये लोकसेवक श्री. अक्षय पाटील यांनी तक्रारदाराच्या वडीलांच्या नावावर असलेली जमिन तक्रारदाराच्या नावावर करून सदर जमिनीचा ७/१२ उतारा देण्याकरीता ७०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.Talathi was caught red-handed by ACB
ठरलेली रक्कम देण्याची वेळ आणि ठिकाण तक्रारदाराकडून कळल्यावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. त्यानुसार तक्रारदाराने 21 सप्टेंबरला दुपारी 1.50 च्या दरम्यान दापोली नगरपंचायतीसमोरील रस्त्यावर तलाठी अक्षय पाटीलला 7 हजार रुपये Corruption दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पंच तक्रारदारासोबत उपस्थित होते. सदरची रक्कम स्विकारताक्षणी गुप्त वेषात असलेल्या अधिकाऱ्यांनी तलाठी अक्षय पाटीलला ताब्यात घेतले आहे. Talathi was caught red-handed by ACB
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल घेरडीकर, पोलीस उप अधीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनंत कांबळे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर व चालक पोली नाईक प्रशांत कांबळे यांनी केली आहे. Talathi was caught red-handed by ACB