• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान तर्फे वह्या व खाऊ वाटप

by Ganesh Dhanawade
August 30, 2022
in Guhagar
18 1
0
Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नं. १ मधील विद्यार्थ्यांना मोफत वहया व खाऊ वाटप करण्यात आले. यासंस्थेने आतापर्यंत २२ गरजू विद्यार्थीनींना दत्तक घेतले आहे. त्यांना १० वी पर्यंत येणारा सर्व शैक्षणिक खर्च केला जाणार आहे. अजून ५० विदयार्थींनींना दत्तक घेण्याचा मानस आहे. Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत संस्थापक, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे यशवंत ऊर्फ नाना पालकर यांच्याकडे गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी केली. त्यानुसार केंद्रीय शाळा कोतळूक नं. १ मधील १ली ते ७ मधील १२५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २वहया व बिस्कीट पुडा वाटप करण्यात आले. श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने आतापर्यंत २२ गरजू विद्यार्थीनींना दत्तक घेतले गेले असून १० वी पर्यंत येणारा सर्व शैक्षणिक खर्च केला जाणार आहे. ५०विदयार्थींनींना दत्तक घेण्याचा मानस आहे. यावर्षी गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये मोफत वहया वाटप, ओळखपत्र, छत्री, दप्तर, अंगणवाडी विद्यार्थी यांना अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पालशेत गावात गेली ३ वर्षे दिवाळीमध्ये किल्ला सजावट स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून दिली आहे. Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

या कार्यक्रमावेळी श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत संस्थापक अध्यक्ष यशवंत ऊर्फ नाना पालकर, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक, मुख्याध्यापक कृष्णा पागडे, पदवीधर शिक्षक प्रताप देसले, जगताप मॅडम, पाटील मॅडम आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNotbook distribution by Sambhaji Smriti Foundationटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.