• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

by Guhagar News
August 27, 2022
in Bharat
17 0
0
Distribution of material to senior citizens and disabled
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न – नितीन गडकरी

मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील  प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि त्यांची सेवा करणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. Distribution of material to senior citizens and disabled

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्यासमवेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री आणि दिव्यांग व्यक्तींना सहाय्य योजनेंतर्गत (ADIP) आज दक्षिण नागपुरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत उपकरणे आणि साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन करताना, गडकरी म्हणाले की आम्ही या उपक्रमासाठी वचनबद्ध आहोत. Distribution of material to senior citizens and disabled

Distribution of material to senior citizens and disabled

2016 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकारने देशात “दिव्यांग  व्यक्तीं हक्क कायदा” जारी केला.  हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 27 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022  या कालावधीत राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नागपूर शहरातील 28000 आणि ग्रामीण नागपुरातील 8000 अशा एकूण 36000 लोकांची तपासणी करण्यात आली होती. या लोकांना आता 2 लाख 41 हजार उपकरणे आणि साहित्याचे वाटप केले जाणार आहे.  याची एकूण किंमत 34.83 कोटी रुपये आहे. Distribution of material to senior citizens and disabled

या उपकरणांच्या वितरणासाठी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत आजचा हा पहिला कार्यक्रम आहे.  दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील 9,018 लाभार्थ्यांना एकूण 66 हजार उपकरणे देण्यात आली आहेत, ज्यांची एकत्रित किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Distribution of material to senior citizens and disabled

Distribution of material to senior citizens and disabled

या उपकरणांच्या 43 प्रकारांमध्ये प्रामुख्याने तीन चाकी सायकल (हाताने चालवली जाणारी), व्हील चेअर, चालण्याच्या काठ्या, डिजिटल श्रवणयंत्र, दृष्टिहीनांसाठी स्क्रीन रीडिंग असलेले स्मार्ट फोन, कृत्रिम हात आणि पायांसह ब्रेल कॅन (फोल्डिंग कॅन) यांसारखी साधने आणि साहित्य यांचा समावेश आहे. Distribution of material to senior citizens and disabled

Tags: Distribution of material to senior citizens and disabledGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.