पोलीस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनामुळे आग आटोक्यात
गुहागर, ता. 22 : रविवारी रात्री 11 वा. पोमेंडी फाट्यानजीक लॅटराईड (जांभा चिऱ्याची माती) घेवून जाणाऱ्या 16 चाकी ट्रकला आग लागली. Truck 0n Fire त्यामुळे दोन तास या रस्त्यावरील वहातूक थांबवून ठेवण्यात आली होती. ग्रामस्थ आणि पोलीसांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत ट्रकचे 14 टायर व डिझेलची टाकी जळून खाक झाली. दरम्यान आग लागल्याचे कळताच ट्रक चालक आणि साथिदाराने ट्रक थांबवून आपला जीव वाचविला.

Truck on Fire
गुहागर तालुक्यातून जांभा चिरा खाणीवरील मातीची वहातूक केली जाते. रविवारी आबलोली परिसरातील खाणीवरुन ही माती घेवून 16 चाकी चार ट्रक हे कर्नाटकला निघाले होते. वेळंब गावानजिक पोमेंडी फाटा येथे रात्री 11 च्या सुमारास या ट्रकमधील पहिल्या ट्रकच्या मागील टायरनी पेट घेतला. Truck on Fire ट्रकच्या चाकांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक रस्त्यातच थांबवला. चालक आणि त्याच्या साथीदार ट्रकमधून उतरले आणि मागून येणाऱ्या ट्रकची वाट पहात थांबले. दरम्यानच्या काळात आबलोलीकडे जाणाऱ्या दुचाकीचालकाने ते पाहिले. तातडीने त्यांनी पोलिसांना फोन लावून पोमेंडी फाटा येथे ट्रक जळत असल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, बीट अंमलदार विशाल वायंगणकर, गणेश कादवडकर, राजेश धनावडे हे पोमेंडी फाट्यावर पोचले. विशाल वायंगणकर यांनी वेळंबमध्ये संपर्क करुन महाडिक आणि नाना या पोलीस मित्रांना घटनेची माहिती दिली. महाडिक आणि नाना हे दोघेजण आणखी काही ग्रामस्थांसह 2 हजार लिटर पाण्याची टाकी आणि पाईप घेवून पोमेंडी फाट्यावर पोचले. पोलीस आणि ग्रामस्थांनी ट्रक विझविण्यास सुरवात केली. दरम्यान दिडच्या सुमारास चिपळूणहून अग्निशामक दलाचा बंब ही घटनास्थळी आला. त्यानंतर आगीवर ताबा Truck on Fire मिळविण्यास सर्वांना यश आले.
Truck on Fire या आगीत ट्रकचे 14 टायर व डिझेल टाकी, ट्रकचा मागील काही भाग जळून खाक झाले. इंजिनपर्यंत आग पोचली होती. ट्रक ओव्हरलोड असल्याने रस्त्यावर टायरच्या होणाऱ्या घर्षणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रकला लागलेल्या या आगीबाबत गुहागर पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार नोंदलेली नाही. ट्रक चालकाने आपल्या कंपनीमध्ये ही माहिती दिली असून मंगळवारपर्यत विमा सर्व्हेअर आणि कंपनीचे अधिकारी ट्रकची पहाणी करण्याकरीता येणार असल्याचे समजते.
Please See Video of Fired Truck
