• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रुप ग्रा. आरे, वाकी, पिंपळवट येथे विधवा प्रथा बंदचा ठराव

by Mayuresh Patnakar
August 12, 2022
in Guhagar
22 1
0
Decision to stop widow practice
44
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12 :  समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील आरे, वाकी, पिंपळवट या ग्रुप ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. हा ठराव दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेसाठी ग्रामस्थ व महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. Decision to stop widow practice

आज विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. Decision to stop widow practice

शासन निर्णयाची नुकतीच आरे, वाकी, पिंपळवट या ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वानुमते विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेसाठी  सन्माननीय सरपंच श्रीकांत वासुदेव महाजन, उपसरपंच शांताराम घडवले सर्व सन्माननीय सदस्य साईनाथ कलझुणकर, सिद्धी सुर्वे, प्राजक्ता देवकर, उज्वला घडवले, प्रणिता साठले, अनुष्का धावडे, अजित कातळे, विठ्ठल धावडे, ग्रामसेविका सौ. मोरे मॅडम,  सोसायटीचे सरपंच चेअरमन  सुरेश सावंत, माझी व्हाईस चेअरमन प्रकाश सावंत, माजी सरपंच नरेश धावडे, शलाका माने, संदीप भोसले, समित घाणेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Decision to stop widow practice

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.