• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोबाईल क्रमांक बदलताना सावध रहा

by Mayuresh Patnakar
August 5, 2022
in Ratnagiri
19 1
0
Rs. 8 lakhs fraud
38
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आठ लाखाला फसली महिला, पोलीसांनी पकडली चोरी

गुहागर, ता. 05 : डिजिटल युगात आपण मोबाईलद्वारे अनेक गोष्टींशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे जग जसं आपल्या मुठीत आलय तसच आपण अधिकाधिक सावध रहाणं आवश्यक आहे. आज आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डापासुन पॅन कार्ड, बँक खात्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जोडला गेला आहे. म्हणुनच शक्यतो आपला मोबाईल क्रमांक कधीही बदलु नका. यदाकदाचित आपल्याला मोबाईल क्रमांक बदलावा लागला. तर ज्या ज्या ठिकाणी आपण तो नंबर जोडला आहे. त्या प्रत्येक संस्थेला कळवून आपला मोबाईल क्रमांक बदलण्यास सांगा. अन्यथा आपली विविध मार्गाने फसवणूक होवू शकते. त्यामुळे सावध रहा. Rs. 8 lakhs fraud

आठ लाखांची फसवणूक

चिंचखरी, ता. जि. रत्नागिरी मधील एका महिलेचे खाते फेडरल बँक, मारुती मंदिर शाखा या ठिकाणी होते. संबंधित महिलेने आपल्या खात्याला मोबाईल क्रमांक 9975259840 हा नोंद केला होता. दरम्यानच्या काळात हा मोबाईल क्रमांक या महिलेने बंद केला. परंतू त्याची माहिती बँकेला दिली नाही. सदर महिला 14 जून 2022 ला आपल्या खात्याची चौकशी करण्यासाठी बँकेत गेली. तेव्हा 25 मार्च 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत डेबीट कार्ड द्वारे अनेकवेळा खात्यातून रु. 8 लाख 85 हजार एकोणतीस इतकी रक्कम काढल्याचे लक्षात आले. सदर महिलेने घडला प्रकार बँक मॅनेजरना सांगितला.

मोबाईल क्रमांकाने केला घात

या महिलेने खात्याला जोडलेला क्रमांक बंद केला होता. परंतु त्याची माहिती बँकेला नव्हती. अज्ञात इसमाकडे हा मोबाईल क्रमांक गेल्यानंतर त्याला फेडरल बँकेत सदर महिलेल्या खात्यावर होणाऱ्या व्यवहारांची माहिती एस.एम.एस. द्वारे मिळू लागली. या बँक खात्यातील लाखो रुपये पाहून सदर अज्ञात इसमाची बुद्धी फिरली.  त्याने या मोबाईल क्रमांकाच्या आधारे बँक खात्याचे डेबिट कार्ड घेतले. आणि 25 मार्च ते 14 जून 2022 या कालावधीत महिलेच्या खात्यातून रु. 8 लाख 85 हजार एकोणतीस इतकी रक्कम काढली.  Rs. 8 lakhs fraud

पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पैशांच्या या अपहाराची तक्रार फेडरल बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहर पोलीसांकडे केली. रत्नागिरी शहर पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक श्री. विनित चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली तपास सुरु झाला. सदर खात्यातून डेबिट कार्ड द्वारे काढलेले पैसे लातूरमधुन काढण्यात आल्याचे लक्षात आले. फसवणुक झालेल्या महिलेने डेबिट कार्ड घेतलेच नव्हते. त्यामुळे डेबिट कार्ड घेताना केलेला पत्रव्यवहार पोलीसांनी तपासला. त्यामध्ये आरोपीचा पत्ता  अशोक हाँटेल अमृता ट्रव्हल्स लातूर 413512 असल्याचे समोर आले. रत्नागिरी शहर पोलीसांची टिम लातूरला रवाना झाली. डेबिट कार्डवरील पत्ता, मोबाईल क्रमांकाचे लोकेशन आणि लातूरमधुन मिळालेली गोपनिय माहिती या सर्वांची छाननी केल्यानंतर गोपाळ भुंजगराव जाधव (वय 28) याला अटक केली. गोपाळ जाधव अमृता ट्रॅव्हल्समध्ये नोकरीला आहे. त्यामुळे तो पत्ता त्याने बँकेला दिला होता. प्रत्यक्षात गोपाळ जाधव आंबेजोगाई रोड, परगे शाळेच्या मागे, शिवाजी नगर, लातुर  येथील पल्लवी केंद्रे यांच्या घरी भाड्याने रहात होता. त्याचे मुळ गाव बीड जिल्ह्यातील निरपण्णा ता. आंबाजोगाई हे आहे. Rs. 8 lakhs fraud

सदरची कामगिरी मोहित कुमार गर्ग पोलिस अधीक्षक रत्नागिरी, जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस  ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांच्या टीमने केली. या टीममध्ये पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे, पोलिस नाईक/124 संकेत महाडीक, पो.ना. / 444 रमीझ शेख, पो.काँ /484 अमित पालवे यांचा सहभाग होता.  Rs. 8 lakhs fraud

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.