भारतीय विज्ञानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयांवर
रत्नागिरी,ता. 5 : मुंबई विद्यापीठचे ठाणे उपपरिसर, कल्याण केंद्र आणि रत्नागिरी उपपरिसर यांच्या संसुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषद ठाणे उपपरिसरात संपन्न झाली. आझादी का अमृत महोत्सव भारतीय विज्ञानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयांवर घेण्यात आली. विज्ञान भारती आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ऑनलाईन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटनपर भाषण एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, ठाणे उपपरिसराचे प्रभारी संचालक अद्वैत वैद्य, रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर उपस्थित होते. National Online Conference Concluded

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात प्रा.रंजना अग्रवाल संचालक, CSIR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च, नवी दिल्ली यांनी ब्रिटीश राज आणि भारतावरील वैज्ञानिक वर्णभेद या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रा जयंती दत्ता उपसंचालक, UGC मानव संसाधन विकास केंद्र, पंजाब विद्यापीठ, चंदीगड ह्यांनी वैज्ञानिक राष्ट्रवादाचा उदय, श्री. विवेकानंद पै सचिव, विज्ञान भारती, कोची भारताच्या वैज्ञानिक-आर्थिक राष्ट्रवादाचा इतिहास, प्रा. व्ही. रामनाथन सहाय्यक प्राध्यापक – रसायनशास्त्र, भारतीय तंत्रज्ञान संस्था-बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी यांनी स्वावलंबनाची सुवासिक कथा: चंदनाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन केले. National Online Conference Concluded

तर दुस-या दिवशी प्रा. डॉ माधुरी वाघ यांनी प्राध्यापक व प्रमुख, द्राव्यगुण विभाग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर यांनी स्वातंत्र्यापूर्वीची आयुवेदाची स्थिती, डॉ. चैतन्य गिरी स्पेस डोमेन सल्लागार, विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली, नवी दिल्ली यांनी मुत्सद्दी शास्त्रज्ञ: 1947 पूर्वी भारताच्या जागतिक बॅटनचे वाहक, प्रा. राजीव सिंग सहाय्यक प्राध्यापक – अजैविक रसायनशास्त्र, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली यांनी भारताचे क्रांतिकारक: वैज्ञानिक आणि स्वातंत्र्यसैनिक आणि डॉ . दिलीप पेशवे यांनी हॅग प्रोफेसर, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर यांनी आत्मनिर्भर भारताकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान नवकल्पना याविषयावर मार्गदर्शन केले. तर या राष्ट्रीय परिषदेचं समारोप भाषण श्री. जयंत सहस्रबुद्धे राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती, नवी दिल्ली. प्लासीची लढाई 1757 आणि भारताचे वैज्ञानिक शोषण आणि डॉ. रवींद्र कुलकर्णी प्र कुलगुरू मुंबई विद्यापीठ यांच्या भाषणाने झाला. National Online Conference Concluded

विज्ञानातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष असं परिसंवादाचे शीर्षक असून भारताचा स्वातंत्र्यलढा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक अशा अनेक आघाड्यांवर चालला होता. ७५ वर्षांपूर्वी भारताला परकीय राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वा पुन्हा मिळवण्याचा संघर्ष आजही सुरू आहे. या सगळ्याची माहिती व्हावी ,यासाठी ह्या परिसंवादाचं आयोजन मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपपरिसर, कल्याण केंद्र आणि रत्नागिरी उपपरिसराने केले होते. National Online Conference Concluded
