• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीच्या रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

by Ganesh Dhanawade
August 3, 2022
in Guhagar
20 0
0
Welcome students to Regal College
39
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 3 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Sringaratali) येथे विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकतेच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अंजनवेल हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गोरिवले, आर.पी.पी. हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. मनोज जोगळेकर यांचा रिगल संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Welcome students to Regal College

नवीन वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वागत गीत – कु. सिद्धी तीवरेकर हिने गायीले. त्यानंतर साऊथ ग्रुप डान्स, फॅशन शो व कोलिनृत्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना रिगल कॉलेज शृंगारतळीच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. Welcome students to Regal College

रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रा. मोरे यांनी रिगल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेतलेले विविध उपक्रम तसेच स्पर्धांची माहिती दिली. आपल्या मुलांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम निवडल्याबद्दल त्यांनी पालकांचे अभिनंदन केले. श्री. गोरिवले यांनी प्रथम वर्षासाठी रिगल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आजचे युग हे संघर्षाचे आहे. तरी मुलांनी संघर्ष करून यश मिळवण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. श्री. जोगळेकर यांनी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या विद्यार्थ्यांची शिस्त वाखणण्याजोगी आहे असे कौतुकोदगार काढले. रिगलच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळेपण जपून ठेवावे, असेही ते म्हणाले. Welcome students to Regal College

Welcome students to Regal College

रिगल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला. तसेच व्यावसायिक प्रशिक्षणांतर्गत आम्हाला विषयांचे सखोल प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले असे अनुभव आपल्या मनोगतांमध्ये विद्यार्थ्यांनी मांडले. रिगल संस्थेचे अध्यक्ष श्री. शिर्के आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले कि, रिगल संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थी हा यश संपादन करतो. आपल्यासोबत रिगलचे सुद्धा नाव उज्ज्वल करत असतो. त्यांनी सर्व पालकांचे रिगल संस्थेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश करून रिगल एज्युकेशन सोसायटीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. या विश्वासाला तडा जाणार नाही व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल याची याची हमी दिली. Welcome students to Regal College

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख चोगले यांनी केले, तर आभार सौ. समिरा नरवणकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. Welcome students to Regal College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.