कमी दाबाने वीज पुरवठा; अंजनवेल कातळवाडीतील ग्रामस्थ आक्रमक
गुहागर, ता.02 : अंजनवेल कातळवाडी परिसरातील वीज दाबाच्या विषयाला बाजूला ठेवून फक्त वीज बिले वसूल करण्याकडेच लक्ष केंद्रित करणार असतील, तर येथील ग्रामस्थ ते कधीही मान्य करणार नाहीत. या सर्व वस्तूंचा विचार करून सर्वप्रथम ज्या ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांचा वीजपुरवठा कोणताही पुनर जोडणी खर्च न घेता, परत जोडून देण्यात यावा. त्यानंतर कातळवाडी येथील सर्व ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात वीज दाब मिळण्यासाठी ट्रांसफार्मरची व्यवस्था करण्यात यावी. असे न झाल्यास सर्व ग्रामस्थ यापुढे कोणताही पत्रव्यवहार किंवा बैठका न घेता लोकशाही मार्गाने याला विरोध करेल, असे महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. Dhadak Morcha on Mahavitrana

अंजनवेल कातळवाडी परिसरात गेली अनेक वर्षे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथील ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थ व अंजनवेल ग्रामपंचायती मार्फत महावितरणला पत्रव्यवहार व बैठका घेतल्या गेल्या. वीज पुरवठा वाढीसाठी ट्रांसफार्मर बसविण्याची विनंती करण्यात आली. परंतु, आजतगायत या भागातील वीज ग्राहकांना अपेक्षित असलेला वीज पुरवठा मिळलेला नाही. अखेर ग्रामस्थांनी वीज बिले भरणे बंद केली आहेत. बिले न भरल्याने महावितरणने कोणतीही नोटीस न देताच 10 जणांचा वीज पुरवठा खंडित केल्याने अखेर सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी गुहागर वीज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी येथील अधिकारी यांना धारेवर धरत आम्हाला वीज बिले भरण्यास सांगण्यापेक्षा आधी जादा वीज पुरवठा होण्यासाठी ट्रांसफार्मरची व्यवस्था करावी. तसे न करता वीज ग्राहकांना धमकावून वीज बिले वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही मार्गाने कडाडून विरोध करू, असा इशारा अंजनवेल कातळवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. Dhadak Morcha on Mahavitrana

गुहागर तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथे गेले अनेक वर्ष वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्तरावरून महावितरण कार्यालयाला संपर्क करण्यात आला आहे. अनेक वेळा बैठक घेण्यात आल्या. सर्व ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा होण्यासाठी जादा दाबाचा ट्रांसफार्मरची मागणी करण्यात आली आहे. कातळवाडी वस्ती बाहेर असलेल्या आताच्या ट्रान्सफॉर्मरची जागा बदलण्यासाठी व मूळ वस्तीत बसवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. परंतु, गेले अनेक वर्ष ग्रामस्थांच्या मागण्यांना काही ना काही कारणाने दुर्लक्ष करण्यात आले आहे. कातळवाडी येथील वीजपुरवठा बद्दलची वस्तुस्थितीबाबत दि. 25 मे 2022 रोजी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होणार असेल तर जून 2022 पासून ग्रामस्थ वीज बीले भरणार नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. Dhadak Morcha on Mahavitrana
दरम्यान, आता सुमारे 20 जुलै 2022 नंतर कातळवाडीतील ग्रामस्थांनी विज बिल आली आहेत. ही बीज बीले भरण्याची तारीख दि. 3 ऑगस्ट 2022 आहे. परंतु, तत्पूर्वीच दि. 28 पासून कातळवाडीतील 10 ग्रामस्थांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी व विद्युत कायदा 2003 च्या कलम 65 (1) नुसार विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित करण्याच्या आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची व वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. वीज बिले वसूल करण्याबरोबरच ग्राहकांना योग्य सेवा देणे ही महावितरण कंपनीची जबाबदारी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु, वीज ग्राहकांना पुरेशा प्रमाणात सेवा न देता फक्त वीज बिले वसूल करण्याकडेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अधिक कळ आहे. यावेळी वीजपुरवठा खंडित करण्याच्या व पुन्हा जोडणीसाठी दंड आकारण्याच्या दमक्याही दिल्या जातात. या भागातील ग्रामस्थांनी आतापर्यंत नेहमीच आपली वीज बिले भरले आहेत. व यापुढे भरणार आहेत. Dhadak Morcha on Mahavitrana

यावेळी ग्रामस्थांनी रानवी येथील महावितरणचे शाखा अभियंता बसवराज कळशेट्टी यांच्याकडे आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी सरपंच यशवंत बाईत, दत्ताराम भुवड, कृष्णा पड्याळ, रमेश पड्याळ, सुरेश देवाले, अनाजी पाते, अनंत बने, मोहन बने, शंकर बागवे, रमेश निवाते, शंकर भुवड, धोंडू निवाते, राहुल बाईत, दिनेश भुवड आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. Dhadak Morcha on Mahavitrana
