निलेश सुर्वे, भंडारी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
गुहागर, ता. 1 : भविष्यात आपण यशवंत, किर्तीवंत व्हावे. मात्र त्यावेळी आपल्या प्रोत्साहन देणाऱ्या समाजाला, गावाला, शाळेला विसरु नका. असा सल्ला भंडारी समाजाचे उपाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते भंडारी समाजाच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. Honored by the Bhandari community

गुहागर तालुका भंडारी समाज या संस्थेतर्फे दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, अन्य व्यावसायिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत शेटे यांनी कित्ते भंडारी संस्थेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भरत शेटे यांच्यावतीने हा सत्कार त्यांचे बंधु सतीश शेटे यांनी स्विकारला. दहावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागल्याबद्दल श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदीर गुहागरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुहागर तालुका पत्रकार संघाला आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मयूरेश पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक कांबळे म्हणाले की, आजच्या गुन्ह्यांमधील सर्वाधिक गुन्हे हुशार लोकांकडून होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशाची हवा डोक्यात शिरु देवू नये. दहावी, बारावी नंतरचा कालखंड हा कायमच संघर्षाचा असतो. या काळात निराश न होता सकारात्मक उर्जा घेवून पुढे जावे. Honored by the Bhandari community
कार्यक्रमाचे अध्यक्ष व समाज संस्थेचे उपाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, आपल्या हातात असलेल्या मोबाईलचा योग्य वापर आपल्या प्रगतीसाठी केला पाहिजे. कमी गुण मिळणाऱ्यांनी निराश होवू नये. शिक्षण कधीही न संपणारे आहे. आपले अंगभूत गुण ओळखून कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे निवडले तर प्रगतीचा मार्ग सापडेल. नोकरी, व्यवसायामध्ये परिश्रमांशिवाय गत्यंतर नाही. हे लक्षात घेवून पुढे जात राहीलो तर मार्ग चुकणार नाही. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर निराशाने ग्रासले तरी चुकीचा मार्ग अवलंबु नका. पालकांसह समाज आपल्या सोबत आहे. Honored by the Bhandari community

या कार्यक्रमात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पदवी आणि पदव्युत्तर परिक्षेत प्रत्येक शाखेत समाजात प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना भेटवस्तुबरोबर काही रक्कमही प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. भेटवस्तु तसेच आर्थिक बक्षिसे आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या खर्चासाठी भरत शेटे, निलेश सुर्वे यांच्यासह अन्य मंडळींनी संस्थेला आर्थिक मदत केली. Honored by the Bhandari community यावेळी माजी अध्यक्ष सायबाशेठ बागकर, मुरलीधर बागकर, सौ. मानसी शेटे, सौ. नेत्रा ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, दिपक कनगुटकर, श्रीधर बागकर, नवनित ठाकूर, निलेश मोरे, निलेश गोयथळे, डॉ. मनोज पाटील, मयूरेश कचरेकर, सतिश शेटे, नेहा वराडकर, विविध गावांचे खोत, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. Honored by the Bhandari community