रत्नागिरी, ता. 29 : अल्पावधीतच नावलौकिक झालेल्या व सलग चार वर्षे सातत्याने ‘अ’ वर्ग राखत सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. अशा खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीची अधिमंडळ वार्षिक बैठक रविवार दि. 24 रोजी पार पडली. संस्थेचे अध्यक्ष संतोष जनार्दन पावरी यांच्या अध्यक्षतेखाली खारवी समाज भवन रत्नागिरी येथे घेण्यात आली होती. Meeting of Kharvi Samaj Credit Institution

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी संस्थेचा सन 2021-22 सालातील लेखाजोखा सभासदांसमोर मांडला. सभासदांनी या सभेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन संस्थेच्या कारभाराबाबत प्रशंसा करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा दिल्या. Meeting of Kharvi Samaj Credit Institution

भविष्याचा वेध घेत शाखा विस्तार, सभासद संख्या वाढवणे व स्वमालकीच्या इमारतीचे उद्दिष्ट पतसंस्थेने ठेवले आहे. येणाऱ्या काळात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था ही नामांकित पतसंस्थेच्या बरोबरीने काम करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या यशाचे गमक हे जिल्ह्यातील सभासदांच्या पतसंस्थेतील आर्थिक उलाढाली मुळेच शक्य झाले. असल्याचे नमूद करून जिल्हाभरातील बांधवांच्या एकजूटीमुळे तसेच संचालक व समन्वय समिती पदाधिकारी यांच्या सहकार्याने शक्य झाल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी सांगितले. Meeting of Kharvi Samaj Credit Institution

यानिमित्ताने पतसंस्थेतील अतुलनीय कामगिरी करणारे श्री. राम सारंग, कु. रूचिरा नाटेकर, वकील सौ. अनघा लाकडे, डाँ.कु. श्रेयसी पटेकर, श्री. निलेश पावसकर, डाँ. शिवम पालशेतकर, श्री. प्रफुल्ल खडपकर, कु. प्रथमा मिरजूळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश जाक्कर यांनी केले. Meeting of Kharvi Samaj Credit Institution
