• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद

by Ganesh Dhanawade
July 28, 2022
in Guhagar
18 0
0
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केली आपल्या कुटुंबापासून सुरूवात

गुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.  ही अनिष्ट प्रथा सरपंचांनी आपल्या कुटुंबापासून गावात सुरू केली आहे. Widow practice stopped in Umrath

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याचे दिलेल्या आदेशानुसार तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. ग्रामपंचायत उमराठने सदर विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याच्या बाबतीत विशेष ग्रामसभेत सकारात्मक निर्णय गुहागर तालुक्यात पहिली तर रत्नागिरी जिल्ह्यात दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. Widow practice stopped in Umrath

ग्रामपंचायत उमराठ कार्यक्षेत्रातील महसुली गाव उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील सरपंच जनार्दन आंबेकर यांचे धाकटे काका कै. सोनू बाबू आंबेकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी गुरूवार दि. २१ जून २०२२ रोजी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आपल्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर घडलेली ही प्रथमच घटना होती. अर्थातच उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील भाऊबंदांसमोर तात्विक समस्या उभी राहिली की नेमके करायचे काय ? समस्या हाताळायची कशी ? त्यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भाऊबंदांना सांगितले की, आपण विशेष ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार यावेळी आमच्या कुटूंबापासून वाटचाल करूया. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबानेहि साथ दिली. Widow practice stopped in Umrath

अंत्यविधीचे सोपस्कार करतेवेळी आंबेकरवाडीतील भाऊबंद आणि महिला भगिनींनी दिलेल्या मुभेप्रमाणे सरपंच यांची काकी विजयाबाई आंबेकर यांनी स्वखुशीने सौभाग्यलेण असलेले फक्त मंगळसूत्र काढून काकांच्या चरणी अर्पण केले. मात्र इतर अनिष्ट प्रथा कुंकू पुसणे, बांगड्या वाढवणे, पायातील जोडवी काढणे इत्यादी कोणत्याही प्रथांचे पाळण केलेले नाही. विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचे श्रीम. विजयाबाई आंबेकर, सरपंच जनार्दन आंबेकर, आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत उमराठ यासर्वांचे गुहागर तालुक्याबरोबरच सर्व स्तरांतून कौतुक केले आहे. Widow practice stopped in Umrath

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWidow practice stopped in Umrathटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.