• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली आगरवाडी शाळेची जनजागृती फेरी

by Ganesh Dhanawade
July 23, 2022
in Guhagar
17 0
0
Public awareness round of Talwali School
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत

गुहागर, ता. 23 :  केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं. 3 मधील विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गांनीही सहभाग घेतला. Public awareness round of Talwali School

गुहागर तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं 3 मधील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, माझा तिरंगा माझ्या मनाचा राजा, माझे घर माझी शान माझा तिरंगा माझा अभिमान अशा स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा दिल्या. व तळवली हॉस्पिटल स्टॉपपर्यंत जनजागृती फेरी काढली. यावेळी गावातील नागरीकांनी स्वयंप्रेरणेने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. Public awareness round of Talwali School

या जनजागृती फेरी वेळी सरपंच मयुरी शिगवण, ग्रा पं.सदस्य संतोष जोशी, मुख्याध्यापक प्रकाश गोरे, शिक्षिका सौ.कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खोकरे, ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण, पत्रकार आशिष कारेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सांगळे, संजय गिजबले, स्वप्निल शिगवण, संतोष जाधव तसेच पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. Public awareness round of Talwali School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublic awareness round of Talwali Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.