गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकोपयोगी वस्तूंचे वाटप
गुहागर, ता. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणतीही बॅनरबाजी अथवा दिमाखदार सोहळ्याचे आयोजन न करता समाज उपयोगी, लोकोपयोगी, सेवाभावी वृत्तीचे कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. त्याचे तंतोतंत पालन करत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले. Distribution of goods on Fadnavis’ birthday

या कार्यक्रमाअंतर्गत शृंगारतळी येथील ग्राम आधार स्वयंसेवी संस्था संचलित जीवन ज्योती विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. भाजपाचे उपाध्यक्ष आणि श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत (नाना) पालकर यांच्या माध्यमातुन वेळंब येथील आकस्मीत अपघाती निधन झालेले भाजपाचे कार्यकर्ते कै. महेश गुरव यांच्या २ पाल्याना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे गुहागर शहर भाजपाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. Distribution of goods on Fadnavis’ birthday

अशा प्रमुख तीन कार्यक्रमाव्दारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष संगम मोरे, भाजप गटनेते उमेश भोसले, सोशल मीडिया प्रमुख दीपक मोरे, उपाध्यक्ष यशवंत पालकर, राजा गुरव, समीर गावणंग, ज्योती परचुरे, संजय मालप, नेहा वराडकर, श्रद्धा घाडे आदि शहर भाजपा पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Distribution of goods on Fadnavis’ birthday

