गुहागर महसूल विभागाची कारवाई
गुहागर, ता.19 : तालुक्यातील परचुरी येथे अवैद्य वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली असून 45 ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या पाच बोटी गायब आहेत. येथे वाळू उपसा करणारे भैये जंगलात पळून गेल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri


परचूरी येथे अवैद्य वाळू व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी याची दखल घेत गेले चार दिवस सर्कल अधिकारी व तलाठी यांची टिम परचूरी येथे जात होती. परचूरी गावात वाळू उपशासाठी असलेली भैंयांची टिम तलाठी वर्गाला दिसली. त्यांची आधारकार्ड दाखवण्यास मागितले असता, आपण पकडले जाणार या भितीने भैंयानी जंगलातून पलायन केले. यामुळे वाळू उपसा बंद झाला. परंतू यापूर्वी उत्खनन केलेली वाळू परचूरी गावात तीन ठिकाणी वाळू साठा करून ठेवण्यात आला होता. शुक्रवारी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी परचूरी येथे भेट दिली असता तीन ठिकाणी वाळू साठा झाडांच्या फांद्यांमध्ये दडवून ठेवलेला होता. महसूल विभागाने हा अवैद्य वाळू साठा जप्त केला असून ज्या जागेत सापडला त्या जागा मालकाला महसूल विभागाने नोटीस काढून सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणी नंतर जागा मालक अथवा वाळू व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. या महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैद्य वाळू व्यवसाय करणाऱ्यांची धावपळ उडाली आहे. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri
परचूरी खाडीत गस्त राहणार- तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे
परचूरी येथे अवैद्य वाळू उत्खनन व व्यवसाय सुरू असल्याचे सिद्ध झाले असून परचूरी खाडीमध्ये कायमची गस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख तेथील ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यात देण्यात यावी, अशी सक्त ताकीद तेथील पोलिस पाटील यांना देण्यात आली आहे. 45 Brass sand Stocks Seized in Parchuri