• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस चालकांची 2174 पदे भरणार

by Mayuresh Patnakar
October 28, 2022
in Maharashtra
20 1
0
2174 posts of Police Drivers Recruitment

2174 posts of Police Drivers Recruitment

40
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरतीसाठी आवेदनपत्र भरताना पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येई. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर उपलब्ध रहाणार आहे. सदर जाहीरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1 टक्का आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी. त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करु शकतात. परंतू खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत. 2174 posts of Police Drivers Recruitment.

पात्रता

पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक (पद संख्या – 2174 जागा)
शैक्षणिक पात्रता – 12th Pass  (मूळ जाहिरात वाचावी)
                          हलके मोटार वाहन व जिप चालविण्याचे कौशल्य हवे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –  खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग: रु. 450 /- ;  मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
(सर्वांनी https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर अर्ज भरताना पात्रता, नियम, अटी व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.)

एका उमेदवाराला एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाहीत.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारी प्रथम 50 गुणांची शारिरीक योग्यता परीक्षा घेण्यात येईल. या चाचणीमध्ये किमान 25 गुण (50 टक्के) गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधुन संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.

लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना हलके मोटार वाहन चालविण्याची 25 गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवाराला उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी ही एक अर्हता चाचणी असून त्याचे गुण गुणवत्ता याद तया करण्यासाठी घेतले जाणार नाहीत. मात्र कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच 100 गुणांची लेखी परीक्षा देता येईल.

लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यामुळे अर्जदाराने ऑनलाईन आवेदन भरताना सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

शारिरीक व लेखी परीक्षामध्ये नमुद केलेल्या दोन्ही निकषांच्या आधारे उमेदवारांमधुन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला झाली. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. त्यामुळे निवडसुचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. 2174 posts of Police Drivers Recruitment.

Districtwise Driver Police constable vacant posts

बृहन्मुंबई – 994 (खुला प्रवर्ग 378)
पुणे शहर – 75 (खुला प्रवर्ग 30)
मिरा भाईंदर – 10 (खुला प्रवर्ग 3)
नागपूर शहर – 121 (खुला प्रवर्ग 53)
अमरावती शहर – 21 (खुला प्रवर्ग 9)
सोलापूर शहर – 73 (खुला प्रवर्ग 29)
औरंगाबाद शहर – 15 (खुला प्रवर्ग 4)
ठाणे ग्रामिण – 48 (खुला प्रवर्ग 19)
रायगड – 6 (खुला प्रवर्ग  2)
पालघर – 5 (खुला प्रवर्ग 1)
सिंधुदूर्ग – 22 (खुला प्रवर्ग 9)
नाशिक ग्रामीण – 15 (खुला प्रवर्ग 5)
अहमदनगर – 10 (खुला प्रवर्ग 5)
पुणे ग्रामीण – 90 (खुला प्रवर्ग 50)
सोलापूर ग्रामीण – 28 (खुला प्रवर्ग 11)
नांदेड – 30
लातुर – 29 (खुला प्रवर्ग 9)
नागपुर ग्रामीण – 47 (खुला प्रवर्ग 18)
भंडारा – 56 (खुला वर्ग 24)
चंद्रपुर – 81 (खुला प्रवर्ग 24)
वर्धा – 36 (खुला प्रवर्ग 12)
गडचिरोली – 160 (खुला प्रवर्ग 39)
गोंदिया -22 (खुला प्रवर्ग 8)
अमरावती ग्रामीण – 41 (खुला प्रवर्ग 16)
अकोला – 39 (खुला प्रवर्ग 14)
वाशिम – 14 (खुला प्रवर्ग 5)
यवतमाळ – 58 (खुला प्रवर्ग 23)
नागपूर लोहमार्ग – 28 (खुला प्रवर्ग 10)

Tags : महाराष्ट्र पोलीस, Maharashtra Police, police recruitment, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra PoliceMarathi NewsNews in Guhagarpolice recruitmentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाराष्ट्र पोलीसलोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.