महाराष्ट्रातील साहित्यिकांचा होणार सन्मान
गुहागर, ता. 28 : रविवार दि. ५ जून २०२२ रोजी बा. भ. बोरकर साहित्यनगरी श्री नवदुर्गा मंदिर प्रांगणात बोरी- फोंडा गोवा येथे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर (Shivcharan Ujjainkar Foundation Muktainagar) आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. 1st Shiv Marathi Sahitya Sammelan

या प्रसंगी महाराष्ट्रातील तसेच गोव्यातील सुद्धा विविध साहित्यिक मान्यवरांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी तसे कळविले आहे. 1st Shiv Marathi Sahitya Sammelan
महाराष्ट्रातील पुरस्कारार्थी मान्यवर
आदिशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार तुळशीरामजी बोबडे, ज्येष्ठ साहित्यिक, अकोला ह. भ. प. भूषण वृषालीताई गायकवाड, समाज प्रबोधनकार, नाशिक तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार डॉ. प्रतीमा इंगोले सुप्रसिद्ध लेखिका, पुणे ग्रंथमित्र प्रा. कृष्णराव गणपतराव जाधव मू. बहिरेवाडी पोस्ट वारणानगर ता. पन्हाळा जि. कोल्हापूर तापी-पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार दिगंबर अर्जुन पाटील, जळगाव माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी, भुसावल जि. जळगाव, मधुकर रामदास चौधरी, जळगाव, खजिनदार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी भुसावळ जि. जळगाव एडोकेट रेखाताई विजयकुमार कस्तुरे चिखली-मेहकर जि. बुलढाणा, तापी -पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कला पुरस्कार सौ. रेणुका श्रीपाद जोशी, प्रा. जगदीश वेदपाठक गायक-संगीतकार, औरंगाबाद, तापी -पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट शाहीरी कला पुरस्कार शाहीर मनोहर रामभाऊ पवार चिखली मेहकर जि. बुलढाणा, तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार बाळासाहेब ठाकरे, दै. विदर्भ केसरी, अकोला, गणेश अनंत धनावडे (दै. सागर) गुहागर जिल्हा रत्नागिरी, जयकुमार प्रकाशराव पाटील (संपादक दैनिक जनमाध्यम), अकोला. 1st Shiv Marathi Sahitya Sammelan
साहित्यातील पुरस्कार
एडवोकेट विजयकुमार कस्तुरे, चिखली जि. बुलढाणा, उद्रेक, काव्यसंग्रह सौ.शीतल पाटील, जळगाव मनाच्या बनामंधी, काव्यसंग्रह विशाल मोहोड, चांदूर बाजार जि. अमरावती कुचंबणा, कथासंग्रह डॉ. बाबुराव उपाध्ये श्रीरामपूर जि. अहमदनगर लॉकडाऊनच्या काळातील कविता, काव्यसंग्रह सौ. आराधना गुरव, सातारा ,वर्तुळ, काव्यसंग्रह देवेंद्र भुजबळ, नवी मुंबई समाजभुषण, कथासंग्रह दिपक दारव्हेकर, कारंजा जि. वाशिम बाप माझा, आत्मकथन सौ. उषा शशिकांत हिंगोणेकर जळगाव धग धगते तळघर- काव्यसंग्रह भारती बाळकृष्ण सोळंके, औरंगाबाद सूर्याला आला ताप- बाल कविता संग्रह डॉ. शांमसुंदर निकम, अमरावती लढा अदृश्य विषाणुंशी, कादंबरी, डॉ. क्षमा शेलार जुन्नर जि. पुणे दशोराज्ञ – कादंबरी, अमृता भालेराव सिडको नाशिक फुल… मला भेटलेली- कथासंग्रह सुभाष उमरकर नाशिक, अंतर्मनाचे तरंग, अलकसंग्रह. 1st Shiv Marathi Sahitya Sammelan
या पुरस्कारार्थी मान्यवरांना बोरी- फोंडा या ठिकाणी आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गौरविले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.
