गुहागर, ता. 03 : तालुक्याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के लागला. तालुक्यातील 28 विद्यालयातून 1221 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1194 विद्याथी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 28 पैकी 15 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 15 schools in Guhagar got 100 percent result


गुहागर तालुक्यातील सरस्वती विद्यामंदीर जामसुत, न्यु इंग्लिश स्कुल तळवली, आदर्श विद्यालय देवघर, गोपाळकृष्ण गोखले विद्यालय कोतळूक, न्यू इंग्लिश स्कुल पडवे, उर्दु हायस्कुल पेवे, न्यू इंग्लिश स्कुल वेळणेश्र्वर, न्यू इंग्लिश स्कुल वेलदूर, माध्यमिक विद्यालय मुंढर, माध्यमिक विद्यालय पाचेरी, डॉ. हरी वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर, न्यू भारत उर्दू हायस्कुल अंजनवेल, न्यू इंग्लिश स्कुल (इंग्रजी माध्यम) पाटपन्हाळे, एक्सलंट अकादमी इंग्लिश मिडीयम स्कुल आबलोली या शाळांचा निकाल 100 टक्के लागला. 15 schools in Guhagar got 100 percent result


गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आर्या पावस्कर 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम आली. कनिष्का समीर बावधनकर (95.40) व यश सुभाष शिर्के (95.40) द्वितीय, हर्षदा शाम नारकर (94.60) व स्मित संतोष गमरे (94.60) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आबलोली माध्यमिक विद्यालयात महम्मदनासीर सौदागर व कुणाल मुंढेकर 94.20 टक्के गुण मिळवून प्रथम आले. वैभव पाटील (92.40) द्वितीय व ज्योतिरादित्य साळुंखे (91.80) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मध्ये वेदांत किरण शिवणकर (९६.६०) प्रथम, हर्षदा संदिप पालकर (९५.८) द्वितीय व फहिम अनिस धामस्कर (९३.८०) याने तृतीय क्रमांक पटकावला. ना.गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय कोतळूक विद्यालयात 84.60 टक्के गुण मिळवत आर्यन उदय बागकर प्रथम आला. साक्षी यशवंत गोरीवले (79 टक्के) द्वितीय व करण शशिकांत गोरिवले (77.60) तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यालयाचा निकालही 100 टक्के लागला आहे. महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयात प्रथम क्रमांक सुजित सुभाष रामाने (85.60 टक्के), द्वितीय क्रमांक सौरभ वसंत पंडित (८२.८० टक्के) व तृतीय क्रमांक सानिका विनोद सुर्वे (८२.४० टक्के) यांनी मिळवला. आबलोलीमधील एक्सलंट अकादमी इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये रिध्दी संतोष साळवी 92.40 टक्के मिळवून प्रथम आली. शेहझीन भाटकर (80 टक्के) द्वितीय व ओमकार दिपक साळवी (77.60 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला. 15 schools in Guhagar got 100 percent result

