• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वगळलेल्या भागाचा विकास आराखडा प्रसिध्द

by Guhagar News
March 26, 2026
in Guhagar
37 0
0
Guhagar Nagar Panchayat Development Plan
72
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायत; हरकती व सूचनांसाठी एक महिन्यांची मुदत

गुहागर, ता. 26 : गुहागर नगरपंचायतीच्या शहर विकास आराखडा अंतिम प्रक्रियेमध्ये असुन गुहागर शहर विकास आराखड्याच्या वगळलेल्या भागाचा अद्यावत नकाशा नगरपंचायत कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तरी पुढील एक महिन्याच्या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. Guhagar Nagar Panchayat Development Plan

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या आराखड्यावर शहरातून 1400 पेक्षा जास्त हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये विशेषतः रस्त्याची रुंदी कमी करणे, काही ठिकाणचे आरक्षण बदलणे असे स्वरूप होते त्याची सुनावणी घेऊन त्याप्रमाणे काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. त्यानंतर वगळलेल्या क्षेत्राचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र अद्यावत नकाशा बद्दल दाखल न झाल्याने बदललेल्या क्षेत्रानुसार जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या नव्हत्या. मंगळवारी गुहागर नगरपंचायतीकडे गुहागर शहर विकास आराखडा च्या वगळलेल्या भागाचा अद्यावत नकाशा दाखल झाला आहे. शहरातील नागरिकांसाठी माहिती व्हावे यासाठी नगरपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आला आहे. Guhagar Nagar Panchayat Development Plan

या फेरबदला संदर्भात पुन्हा नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून नगररचना विभाग सहसंचालक यांची येणाऱ्या हरकती व सूचना वर सुनावणी देण्याकरिता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या विकास आराखड्याबद्दल हरकती व सूचना असतील तर त्या कोकण भवन येथे नगर रचना सहसंचालक यांच्याकडे आजपासून एक महिन्याच्या कालावधीत पाठवाव्यात, अशी जाहीर सूचना नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी प्रसिद्ध केली आहे. Guhagar Nagar Panchayat Development Plan

Tags: GuhagarGuhagar Nagar Panchayat Development PlanGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.