गुहागर, ता. 16 : तालुक्यातील शृंगारतळी येथील आदर्शवत व्यक्तिमत्त्व तथा पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेश मुरलीधर कोळवणकर यांची पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पंचरत्न ग्रुप, शृंगारतळी तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. Mahesh Kolvankar, President of Patpanhale Education Society
महेश कोळवणकर यांनी सहकार, सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहीला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Mahesh Kolvankar, President of Patpanhale Education Society
