स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचे निर्देश ; खा. प्रतापराव जाधव
गुहागर, ता.31 : तालुक्यात अंजनवेल, पडवे, पालशेत, वेळणेश्वर या जिल्हा परिषद गटात तर गुहागर शहर, शृंगारतळी येथे लोक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी संपर्क अभियानाच्या निमित्ताने बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते यांनी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे निर्देश यावेळी बुळढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले. Response to Shiv Sampark Mission
पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुका येथील स्थानिक कार्यकर्ते लढवत असतात. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी गावा गावामध्ये संपर्क ठेवण्यात यावे. त्याचप्रमाणे २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आणून बहुमताने सरकार आपल्याला स्थापन करायचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने केलेली कामे जनसामान्यांपर्यंत पोचवा, मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, जुने नवे वाद हे एकत्रित बसून मिटवण्याचा प्रयत्न करा. येथील स्थानिक आमदार भास्कर जाधव यांचं चांगलं काम असून त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे रहा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. Response to Shiv Sampark Mission
पक्षांतर्गत जुने नवे, मतभेद आणि नाराजी विसरून कामाला लागा. ज्यांना पक्षासाठी वेळ देता येत नाही. त्यांनी बाजूला होऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या. आजच्या सभेचा अहवाल पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्य मंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या जबाबदारीचे, पदाचे भान असले पाहिजे, असे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख, सुधीरभाऊ मोरे यांनी सांगितले. Response to Shiv Sampark Mission
सभेच्या प्रास्ताविकमध्ये तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी सांगितले की, गुहागर तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. येथे आरोग्य सुविधा कमी प्रमाणात आहे. अधिक उपचारासाठी रूग्णांना दूर न्यावे लागते. निम्म्यापेक्षा अधिक लोक मुंबई येथे काम करत आहेत. येथे रोजगाराची संधी उपलब्ध नाही. रस्ते, वीज, पाणी आदी नागरिकांच्या मागण्या वाढत आहेत. गुहागर तालुक्याचा विकासात्मक अहवाल आपल्याकडून वरिष्ठांकडे जाईल अशी आशा व्यक्त करतो, असे स्पष्ट केले. Response to Shiv Sampark Mission
या सभेसाठी बुळढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हा प्रमुख सचिन कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, लोकाधिकार समितीचे दिलीप बढेकर, श्रीकृष्ण शेवाळे, तालुका प्रमुख सचिन बाईत, युवा सेना तालुकाधिकारी अमरदीप परचुरे, उप तालुका प्रमुख नारायण गुरव, काशिनाथ मोहिते, विलास वाघे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, रवींद्र आंबेकर,पांडुरंग कापले, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार, शहर अध्यक्ष नरेश पवार, प्रल्हाद विचारे, पिंट्या संसारे आदी उपस्थित होते. Response to Shiv Sampark Mission