गुहागर, ता.14 : लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोतळूक-कावणकरवाडी नदीवरील पुलाचे काम मंजूर झाले होते. हे काम ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी अवघ्या ३४ दिवसात पूर्ण करून ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबद्दल येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचे आभार मानले आहेत. या पुलाची लांबी ४० मीटर असून रुंदी सव्वा आठ मीटर आहे. Villagers thank Chiplunkar

कोतळूक- कावणकरवाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी साकव आहे. मात्र, या साकवावरून ये -जा करणे धोकादायक बनले होते. यामुळे येथील ग्रामस्थांनी नदीवर पूल व्हावा अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोतळूक – कावणकर वाडी येथील नदीवरील पुलासाठी निधी मंजूर झाला. या पुलाच्या निविदेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या पुलाच्या उभारणीसाठी सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे, गुहागर विभाग उपअभियंता श्रीमती निकम, शाखा अभियंता श्री. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ३४ दिवसातच या पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पुलाची ४० मीटर लांबी असून रुंदी सव्वा आठ मीटर आहे. Villagers thank Chiplunkar
यावेळी येथील ग्रामस्थांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान मिळाले असल्याची माहिती ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी दिली. अल्पावधीतच या पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याने येथील गुहागरचे माजी सभापती विलास वाघे, शाखाप्रमुख प्रदीप कावणकर, कावणकरवाडी प्रमुख सीताराम कावणकर, बाधवरेवाडी वाडीप्रमुख तुकाराम बाथवरे, वाघेवाडी वाडी प्रमुख शंकर वाघे, उपविभागप्रमुख अंकुश शिगवण, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, कोतळूक तंटामुक्ती अध्यक्ष विजय बाधवरे, महिला अध्यक्ष स्वप्नाली कावणकर, बाधवरेवाडी महिला अध्यक्ष अवंतिका बाधवरे, कोतुळ पोलीस पाटील अनुजा वाघे, तंटामुक्ती सदस्य आनंद शिगवण, रामचंद्र जाधव बाधवरे, नरेश कावणकर, शांताराम कळंबटे, यशवंत कावणकर या सर्व ग्रामस्थांनी ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. Villagers thank Chiplunkar
