• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण रेल्वेचे 100% विद्युतीकरण

by Manoj Bavdhankar
June 21, 2022
in Bharat
16 0
0
Electrification of Konkan Railway
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्गाचे व इतर रेल्वे प्रकल्पांच लोकार्पण

मुंबई, ता.21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बेंगळुरू, कर्नाटक येथील कार्यक्रमात 100 टक्के विद्युतीकरण झालेल्या रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूर (कर्नाटक) या कोकण रेल्वे मार्गाचे आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. ‘मिशन 100% विद्युतीकरण – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी, मडगाव आणि उड्डपी येथील इलेक्ट्रिक लोको ट्रेनला पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹1287 कोटी आहे. केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मडगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. Electrification of Konkan Railway

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, कोकण रेल्वे विद्युतीकरणामुळे गोव्याचा शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत होईल, तसेच पर्यावरण रक्षणासाठी मदत होईल. Electrification of Konkan Railway

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमात, बयप्पनहल्ली येथील वातानुकूलीत रेल्वे स्थानक सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. सुमारे 315 कोटी रुपये खर्चून आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर हे रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे. Electrification of Konkan Railway

कोकण रेल्वे मार्गावर एकूण 91 बोगदे आहेत, ज्याची एकूण लांबी 84.496 किमी (एकूण मार्गाच्या 11%) आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पाच टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. ठोकूर-बिजूर, बिजूर-कारवार-कारवार-थिवी, थिवी-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा. यातील शेवटचा टप्पा रत्नागिरी-थिवीचे विद्युतीकरण 28.03.2022 रोजी पूर्ण झाले. सर्व लोको पायटलना टप्प्याटप्याने इलेक्ट्रीक वाहतूकीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Electrification of Konkan Railway

कोकण रेल्वेचे आता 100% विद्युतीकरण झाले आहे. यामुळे उच्च परिचालन कार्यक्षमता आणि वाहतुकीसाठी कमी खर्च होईल, याचा देशाला तसेच कोकण रेल्वे महामंडळाला फायदा होईल. विद्युतीकरणामुळे वार्षिक 150 कोटी रुपये इंधनावरील बचत होईल. तसेच वाहतूकखर्चात 18% नी कपात होईल. Electrification of Konkan Railway

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • एकूण मार्ग-740 किमी
  • महाराष्ट्र- 382 किमी, गोवा-106 किमी आणि कर्नाटक- 252 किमी
  • रेल्वेमार्ग लांबी- महाराष्ट्र- 970 किमी, गोवा- 163 किमी, कर्नाटक: 294 किमी
  • विद्युतीकरणासाठीचा एकूण खर्च:  1,287 कोटी रुपये
Tags: Electrification of Konkan RailwayGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrime Minister Narendra Modiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.