• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

by Ganesh Dhanawade
October 26, 2020
in Old News
16 0
1
चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : शृंगारतळी येथील प्रसिद्ध मीना बाजार येथे एका दुकानावर ग्रीननेट बांधण्यासाठी चढलेल्या १७ वर्षीय तरुणाला ११ केव्ही विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकाराने शृंगारतळी बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
शृंगारतळी शृंगारी येथील इब्राहिम रहेमतुल्ला तांडेल (वय १७) हा बाजारपेठेतील प्रसिद्ध मीना बाजार याठिकाणी एका दुकानदाराचे ग्रीननेट बांधण्यासाठी गेला होता. सायंकाळी दुकानाच्या वरील बाजूस ग्रीननेट बांधत असताना वरून गेल्या विजेच्या ११ केव्ही वीज वाहिन्यांना इब्राहिमचा स्पर्श झाल्याने तो जागीच मृत्यू पावला. इब्राहिमचे दहावीपर्यंत शिक्षण पाटपन्हाळे इंग्रजी माध्यम हायस्कूल मध्ये झाले. गेल्याच वर्षी त्याने दहावी पूर्ण केली होती. इब्राहिमला एक लहान व एक मोठा असे दोन भाऊ आहेत. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे वडिल कामानिमित्त बाहेरगावी असतात.

[bsa_pro_ad_space id=3]

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.